स्थलांतरितांच्या लोंढ्यांसाठी अमेरिका मेक्सिको सीमेवर १५०० जवान तैनात करणार

- अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाची घोषणा

वॉशिंग्टन – कोरोनाच्या काळात स्थलांतरितांचे लोंढे रोखण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या निर्बंधांची मुदत पुढच्या आठवड्यात संपुष्टात येत आहे. त्यानंतर मेक्सिकोच्या सीमेतून स्थलांतरितांची नवी लाट अमेरिकेत धडकू शकते. या पार्श्वभूमीवर लवकरच १५०० जवानांची तुकडी मेक्सिकोच्या सीमेवर तैनात केली जाईल, अशी घोषणा पेंटॅगॉनने केली. ही तैनाती सीमेवरील सुरक्षा नियोजनासाठी असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल पॅट रायडर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, येत्या काळात सीमेवरील स्थलांतरितांबाबतची धोरणे अधिक कठोर करण्याबाबत अमेरिका व मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे.

स्थलांतरितांच्या लोंढ्यांसाठी अमेरिका मेक्सिको सीमेवर १५०० जवान तैनात करणार - अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाची घोषणाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या काळात स्थलांतरितांचे लोंढे थोपविण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर ‘टायटल ४२’ कलम लागू केले होते. यानुसार आपत्तीकाळात स्थलांतरित आणि आश्रयासाठी सीमेवर दाखल झालेल्यांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला होता. तसेच स्थलांतरितांचे लोंढे रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’ उभारण्याची घोषणाही केली होती. ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांचे सारे निर्णय फिरविण्याचे जाहीर केले. पण ‘टायटल ४२’ मागे घेण्यात बायडेन यांना अपयश आले होते.

पुढच्या आठवड्यात ११ मे रोजी ‘टायटल ४२’ कलमाची मुदत संपुष्टात येत आहे. त्यानंतर मेक्सिकोच्या सीमेतून स्थलांतरितांची नवी लाट अमेरिकेत धडकू शकते. आधीपासून मेक्सिकोच्या सीमेवर तैनात असलेल्या २५०० जवानांवर सीमेची सुरक्षा करण्यात ताण येऊ शकतो, असा दावा पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल रायडर यांनी केला. स्थलांतरितांच्या लोंढ्यांसाठी अमेरिका मेक्सिको सीमेवर १५०० जवान तैनात करणार - अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाची घोषणाया पार्श्वभूमीवर, १५०० जवानांची अतिरिक्त तैनाती मेक्सिकोच्या सीमेजवळ तैनात केली जाईल, असे रायडर यांनी सांगितले. १० मे पर्यंत अमेरिकन लष्कर व मरिन्समधील जवान मेक्सिकोच्या सीमेवर दाखल होतील, अशी माहिती रायडर यांनी दिली.

यानंतर बेकायदेशीर आणि कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांना रोखण्यासाठी ‘टायटल ८’ लागू केले जाणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. बायडेन प्रशासनाने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीच्या सल्लागार लिझ शेरवूड-रँडल यांनी मंगळवारी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्यूअल लोपेझ ओब्राडोर यांची भेट घेतली. यावेळी बेकायदेशीर स्थलांतरितांची घुसखोरी रोखणे तसेच इतर पर्यायी मार्ग खुले करण्याबाबत अमेरिका व मेक्सिकोच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो.

स्थलांतरितांच्या लोंढ्यांसाठी अमेरिका मेक्सिको सीमेवर १५०० जवान तैनात करणार - अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाची घोषणायाबरोबर अमेरिका-मेक्सिको यापुढे व्हेनेझुएला, हैती, क्युबा आणि निकारगुआ या मध्य व दक्षिण अमेरिकी देशांमधील स्थलांतरितांना स्वीकारणे सुरू ठेवतील. तर अमेरिकेत जवळचे नातलग असलेल्या होंडुरास, ग्वातेमाला आणि अल साल्वाडोर या लॅटीन देशांमधील जवळपास एक लाख जणांना प्रवेश दिला जाणार आहे. मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेतील प्रवेशासाठी प्रतिक्षेत असणाऱ्यांमध्ये हैतीमधील १८ हजारांहून अधिक स्थलांतरितांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या स्थलांतरितांच्या आडून अमेरिकेत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या आणि माफिया गँगचे सदस्य घुसखोरी करू शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मेक्सिको सीमेतून घुसखोरी करणाऱ्या स्थलांतरितांचा मुद्दा हा बायडेन प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. अमेरिका-मेक्सिकोच्या सीमा जगातील इतर कोणत्याही सीमेपेक्षा स्थलांतरितांसाठी सर्वाधिक प्राणघातक ठरल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने गेल्या वर्षी दिला होता. अमेरिकेच्या सीमेवरील ही परिस्थिती राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाल्याची जोरदार टीका त्यावेळी झाली होती.

हिंदी

 

leave a reply