‘ईटीआयएम’वर कारवाई टाळणार्‍या तालिबानला चीनने खडसावले

दोहा/बीजिंग – काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानल मान्यता द्यावी, असे आवाहन चीनने केले होते. पण आता चीनने तालिबानबाबत कठोर भूमिका स्वीकारलेली आहे. चीनमधील उघूरवंशियांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात लढणार्‍या ‘ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंट-ईटीआयएम’चे नेते व दहशतवादी अफगाणिस्तानात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊनही तालिबानने तशी कारवाई केलेली नाही. तसेच ईटीआयएमच्या नेत्यांनाही आपल्या हवाली केलेले नाही, अशी चीनची तक्रार आहे. यामुळे तालिबान अमेरिकेच्या हस्तकासारखे काम करीत असल्याचा संशय चीनला येऊ लागला आहे. तसेच अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार म्हणजे अमेरिका व भारताने मिळून चीनविरोधात आखलेले कारस्थान असावे, अशी शक्यता चीनचे विश्‍लेषक व्यक्त करू लागले आहेत.

‘ईटीआयएम’वर कारवाई टाळणार्‍या तालिबानला चीनने खडसावलेतीन दिवसांपूर्वी कतारची राजधानी दोहा येथे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई आणि तालिबानच्या राजवटीचे उपपंतप्रधान मुल्ला बरादर यांची भेट झाली. या भेटीनंतर चीन अफगाणिस्तानसाठी आर्थिक सहाय्य देणार असल्याचे तालिबानने जाहीर केले. पण आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या बैठकीत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबानला खडसावल्याचे दावे केले आहेत.

जुलै महिन्यापासून तालिबानचे नेते व चीनच्या अधिकार्‍यांमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत. यापैकी तियांजीन येथील बैठकीत परराष्ट्रमंत्री वँग यांनीच तालिबानचा नेता बरादर याच्यासमोर ईटीआयएमच्या दहशतवाद्यांना चीनच्या हवाली करण्याची मागणी केली होती. ‘ईटीआयएम’वर कारवाई टाळणार्‍या तालिबानला चीनने खडसावलेतर गेल्या महिन्यात चीनच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख चेन वेंगिंग यांनी अफगाणिस्तानचा दौरा करून तालिबानमधील हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानीची भेट घेतली. या भेटीतही तालिबानने ईटीआयएमशी सहकार्य तोडले नसल्याचा आरोप करून त्यावर संताप व्यक्त केला. तसेच ईटीआयएमच्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर चीनकडे सोपवावे, अशी सूचना चीनने केली होती.

सोमवारी दोहा येथे झालेल्या बैठकीत गेल्या दोन महिन्यांत तालिबानने ईटीआयबरोबरचे संबंध तोडलेले नाहीत, याची आठवण करून देऊन चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी तालिबानला खडसावले. उलट अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील कुंदूझ प्रांतात प्रार्थनास्थळावर झालेल्या आत्मघाती स्फोटामागे ईटीआयएमचा दहशतवादी होता, याकडे चीनने लक्ष वेधले. चीनला दिलेली आश्‍वासने तालिबान पूर्ण करीत नसल्याची तक्रार परराष्ट्रमंत्री वँग यांनी केली.

‘ईटीआयएम’वर कारवाई टाळणार्‍या तालिबानला चीनने खडसावलेचीनच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचा अधिकृत अभ्यासगट ‘चायना इन्स्टिट्युट्स ऑफ कंटेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन्स-सीआयसीआर’चे विश्‍लेषक हु शिशेंग यांनी तालिबानबाबत चीनला वाटत असलेला संशय व्यक्त केला. एका लष्करी विश्‍लेषकांच्या बैठकीत त्यांनी याबाबत आपल्या देशाला सावध केले. अफगाणिस्तानातील सैन्यमाघार हा अमेरिकेच्या व्यापक धोरणाचा भाग असू शकतो. अफगाणिस्तानातून माघार घेतलनंतर अमेरिका भारताबरोबर भक्कम लष्करी सहकार्य प्रस्थापित करून चीनला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत तालिबान अमेरिकेच्या हस्तकासारखी काम करू शकते, चिंता चीनला वाटत आहे. आपल्या मागणीनुसार तालिबान ईटीआयएमवर कारवाई करीत नसल्याने चीनचा तालिबानवरील संशय अधिकच बळावला आहे. म्हणूनच ईटीआयएमकडून असलेला धोका लक्षात घेऊन चीनने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ ताजिकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याची तयारी केली आहे.

leave a reply