चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगामुळे जागतिक सुरक्षेला धोका

- इस्रायली वर्तमानपत्राचा इशारा

जेरूसलेम/तैपेई – बुद्धिसंपदेची प्रचंड प्रमाणात चोरी आणि अनुचित व्यापारी पद्धतींसाठी चीन कुख्यात आहे. अशा या देशाच्या सेमीकंडक्टर उद्योगामुळे जागतिक सुरक्षेला मोठा धोका संभवतो. सेमीकंडक्टर्सच्या सहाय्याने आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा चीनकडून होणारा वापर देखील धोकादायक असून तो रोखण्यात यावा, असा इशारा इस्रायलच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने दिला. दरम्यान, ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी-टीएसएमसी’चे संस्थापक मॉरिस चँग यांनी देखील चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगावरील अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगामुळे जागतिक सुरक्षेला धोका - इस्रायली वर्तमानपत्राचा इशाराचीनच्या सेमीकंडक्टर उद्योगाचा बहिष्कार करण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने ‘द चिप्स अँड सायन्स ॲक्ट’ या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. या क्षेत्रातील चीनचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आणि चीनच्या कंपन्यांना मिळणारा सेमीकंडक्टर्सचा पुरवठा मर्यादित करण्याची घोषणा बायडेन प्रशासनाने केली होती. यामुळे सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील चीनचा प्रभाव कमी होईल, असा दावा बायडेन प्रशासनाने केला होता. ‘टीएसएमसी’चे संस्थापक मॉरिस चँग यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेच्या या भूमिकेचे समर्थन केले.

अयोग्य मार्गाने चीनने सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्राचा केलेला वापर लक्षात घेता, सेमीकंडक्टर्सचे जागतिकीकरण संपुष्टात आले आहे. मुक्त व्यापार बंद झाला आहे, असेच म्हणावे लागेल. चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगामुळे जागतिक सुरक्षेला धोका - इस्रायली वर्तमानपत्राचा इशाराआता या क्षेत्रातील चीनची आघाडी मोडून काढावी लागणार असून त्यासाठी अमेरिकेने उचललेल्या पावलांचे मी समर्थन करतो’, असे चँग यांनी स्पष्ट केले. पण बायडेन प्रशासनाने टाकलेल्या निर्बंधांचा चीनच्या सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रावर कुठलाही परिणाम होणार नसल्याची परखड टीका इस्रायलच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केली.

बुद्धिसंपदा कायद्याचा अनादर करणाऱ्या आणि चुकीच्या व्यापारी पद्धतींचा अवलंब करणाऱ्या चीनवर अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम होणार नाही. काही दिवसांपूर्वी चीनने याची कबुली दिली होती, याकडे इस्रायली वर्तमानपत्राने लक्ष वेधले. अशा परिस्थितीत जागतिक सुरक्षेसाठी धोका ठरणाऱ्या चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगाला रोखण्यासाठी मोठी पावले उचलावी लागतील, असे या इस्रायली वर्तमानपत्राने सुचविले आहे.

हिंदी

 

leave a reply