शी जिनपिंग यांच्या निर्णयांमुळे चीनमधील सुधारणा पर्वाची अखेर

- डेंग शाओपिंग यांच्या धोरणांना तिलांजली दिल्याचा विश्लेषकांचा दावा

बीजिंग – काही दिवसांपूर्वी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनात शी जिनपिंग यांनी तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. ही सूत्रे हाती घेत असताना जिनपिंग यांनी घेतलेले निर्णय चीनचे माजी सर्वोच्च नेते डेंग शाओपिंग यांच्या सुधारणा पर्वाची अखेर करणारे ठरले आहेत, असा दावा पाश्चिमात्य विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. पक्ष व सरकार वेगळे ठेवणे, सामूहिक नेतृत्त्व, खाजगी उद्योगांना प्रोत्साहन, मध्यवर्ती बँकेला दिलेले अधिकार, पंतप्रधान पदाचे स्वतंत्र स्थान यासारख्या अनेक तरतुदी जिनपिंग यांनी रद्द केल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले. त्यामुळे पुढील काळात चीन व पाश्चिमात्य देशांमधील अविश्वास तसेच संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शी जिनपिंग यांच्या निर्णयांमुळे चीनमधील सुधारणा पर्वाची अखेर - डेंग शाओपिंग यांच्या धोरणांना तिलांजली दिल्याचा विश्लेषकांचा दावा1978 ते 1989 या काळात चीनचे ‘पॅरामाऊंट लीडर’ म्हणून कार्यरत राहिलेल्या डेंग शाओपिंग यांनी चीनमध्ये ‘रिफॉर्म ॲण्ड ओपनिंग अप’ पर्वाला सुरुवात केली होती. या काळात त्यांनी चीनला समाजवादी अर्थव्यवस्थेपासून दूर करून जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी आधुनिक अर्थव्यवस्था बनविण्याची कामगिरी पार पाडली. अमेरिकेबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे श्रेयही शाओपिंग यांना देण्यात येते. ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’, परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन, खाजगी उपक्रमांना उत्तेजन, मध्यवर्ती बँकेला अतिरिक्त अधिकार देणे यासारख्या अनेक गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. चीनचा प्रभाव असलेला समाजवाद हे त्यांचे धोरण पुढे ‘डेंग शाओपिंग थिअरी’ म्हणून प्रसिद्ध झाले.

डेंग यांची धोरणे, विविध योजना व निर्णयांमुळेच चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यात यशस्वी ठरला, असे म्हटले जाते. 2013 साली पहिल्यांदा चीनची सूत्रे हाती घेणाऱ्या शी जिनपिंग यांनीही सुरुवातीच्या काळात डेंग यांच्या धोरणांचा उल्लेख तसेच प्रशंसा केली होती. मात्र पूर्वसुरींनी घेतलेल्या निर्णयांमुळे पक्ष मूळ धोरणापासून दूर गेल्याचा तसेच पक्षात गटबाजी व भ्रष्टाचार वाढल्याची जिनपिंग यांची धारणा झाली. त्याचवेळी पक्ष व देशावरील आपली पकड मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षेने जिनपिंग यांना माओ यांच्या धोरणांकडे खेचले आणि त्यातून त्यांनी डेंग यांचे सुधारणावादी निर्णय उलटे फिरविण्यास सुरुवात केली, असा दावा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकी दैनिकाने केला आहे. पक्ष आणि देश या दोघांना वेगवेगळे ठेवणे ही चीनच्या सुधारणा पर्वातील मुख्य बाब ठरली होती. शी जिनपिंग यांच्या निर्णयांमुळे चीनमधील सुधारणा पर्वाची अखेर - डेंग शाओपिंग यांच्या धोरणांना तिलांजली दिल्याचा विश्लेषकांचा दावामात्र असे विभाजन अनावश्यक असल्याचे जिनपिंग यांनी वारंवार सांगितले होते. आता त्यांनी ही बाब प्रत्यक्षात उतरविल्याचे दिसत आहे, याकडे ‘लोवी इन्स्टिट्यूट’मधील अभ्यासक रिचर्ड मॅकग्रेगर यांनी लक्ष वेधले. सोमवारी संपलेल्या अधिवेशनात जिनपिंग यांनी देशाचे प्रशासन हाताळताना सर्वच क्षेत्रांमध्ये पक्षाचे नेतृत्त्व प्रमुख राहील, यावर भर दिल्याचे दिसून आले आहे असे पाश्चिमात्य माध्यमांनी म्हटले आहे. डेंग यांनी देशाचा पंतप्रधान अर्थव्यवस्थेची धुरा सांभाळेल, अशी तरतूद केली होती. मात्र जिनपिंग यांनी पंतप्रधानाला ‘ऑफिस मॅनेजर’ बनविले असल्याचा टोला विश्लेषकांनी लगावला आहे.

शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक असलेल्या माओ यांचे मॉडेल पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्ष देशाची अर्थव्यवस्था सांभाळेल व वैचारिक बांधिलकी ही व्यावसायिक कौशल्यापेक्षा जास्त महत्त्वाची असेल, असा त्याचा अर्थ आहे’, या शब्दात अमेरिकेच्या माजी अधिकारी सुसान शिर्क यांनी जिनपिंग यांच्या निर्णयांवर टीका केली. जिनपिंग यांनी पक्षात तसेच प्रशासनात निवडलेले नेते केवळ त्यांच्याशी निष्ठा या एकाच निकषावर निवडण्यात आल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

जिनपिंग यांचे हे निर्णय त्यांना कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक माओ यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली बनविणारे ठरले आहेत. कम्युनिस्ट पार्टीत यापुढेही निवडण्यात येणाऱ्या नेतृत्त्वावर जिनपिंग यांचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहेत. हे करताना त्यांच्यावर कोणत्याही माजी नेत्यांचा वचक अथवा दडपण नसेल, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत. शी जिनपिंग यांच्या निर्णयांमुळे चीनमधील सुधारणा पर्वाची अखेर - डेंग शाओपिंग यांच्या धोरणांना तिलांजली दिल्याचा विश्लेषकांचा दावा2012 साली शी जिनपिंग यांनी प्रथम कम्युनिस्ट पार्टीचे नेते म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी हळूहळू पक्ष व देशावरील आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा देखावा उभा करून त्यांनी पक्षातील आपल्या विरोधकांना दूर केले. यात तब्बल 200 वरिष्ठ नेते व लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

2017 साली झालेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनानंतर जिनपिंग यांनी सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद आपल्याकडे घेऊन लष्करावर नियंत्रण मिळविले. त्याचवेळी फक्त दोन वेळाच राष्ट्राध्यक्षपद भूषविण्याची मर्याद्ा दूर करून आपण आजीवन नेतृत्व करणार असल्याचे संकेतही दिले. आपल्या विचारांना पक्षाच्या विचारसरणीत सामील करून पक्षाचे संस्थापक असणाऱ्या माओंइतकेच मोठे नेते असल्याचे चित्र जिनपिंग यांनी उभे केले होते.

हिंदी English

 

leave a reply