चीनने 39 विमाने, तीन विनाशिका तैवानच्या दिशेने रवाना केल्या

तीन विनाशिकातैपेई – चीनने तैवानच्या विरोधातील आपल्या लष्करी हालचाली पुन्हा तीव्र केल्या आहेत. बुधवारी चीनने 39 लढाऊ विमाने आणि तीन विनाशिका तैवानच्या दिशेने रवाना केल्या. यासाठी तयार असलेल्या तैवानने देखील आपली लढाऊ विमाने रवाना करून चीनच्या विमानांना पळ काढण्यास भाग पाडले.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहा या चोवीस तासांमध्ये चीनने तैवानच्या दिशेने ही आक्रमकता दाखविली. यामध्ये चीनच्या लढाऊ विमानांसह चार बॉम्बर विमानांचा देखील समावेश होता. यापैकी लढाऊ विमानांनी तैवानजवळच्या बाशी आखातातून प्रवास केला. तर विनाशिकांनी तैवानच्या सागरी हद्दीजवळून गस्त घातली. ऑगस्ट महिन्यात अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने या क्षेत्रातील आपली लष्करी आक्रमकता वाढविली आहे. त्याचबरोबर चीनचे नेते व लष्करी अधिकारी तैवानच्या विलिनीकरणाची धमकी देत आहेत. याची गंभीर दखल घेत जपानने तैवानची सुरक्षा या क्षेत्रासाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. चीनने तैवानचा ताबा घेतला तर जपानची सुरक्षा धोक्यात येईल, याकडेही जपानने लक्ष वेधले होते. तसेच तैवानच्या सुरक्षेबाबत अमेरिकेने ढिलाई दाखवू नये, असे जपानने बजावले होते.

leave a reply