अमेरिकेत चीनकडून २० ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसानभरपाईसाठी याचिका दाखल

वॉशिंग्टन –  अमेरिकेतील आघाडीचा गट आणि कंपनीने मिळून चीनचे सरकार, लष्कर आणि संबंधित संघटनांवर तब्बल २० ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची याचिका अमेरिकी न्यायालयात दाखल केली आहे. चीनने जैविकशस्त्राचा वापर करुन कोरोनाव्हायरसची निर्मिती केली, असा आरोप या गटाने केला आहे. या गटाने चीनकडे मागितलेली नुकसानभरपाईची रक्कम चीनच्या जिडीपीपेक्षा जवळपास तिप्पट आहे.

‘फ्रिडम वॉच ऍड्वोकसी ग्रुप’ या गटाचे वकिल लॅरी क्लेमन आणि टेक्सास मधील कंपनीने दोन दिवसांपूर्वी हा खटला भरला आहे. क्लेमन यांनी केलेल्या आरोपांनूसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए), लष्करप्रमुख, ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’ आणि संबंधित संघटना जगभरात हजारोंचा बळी घेणार्या कोरोनाव्हायरससाठी जबाबदार असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

या विषाणूचा शस्त्रासारखा वापर करुन चीनने सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेतला तसेच दहशतवाद्यांना शस्त्रसज्ज करण्याची तरतूद केली आहे. दहशतवाद्यांना सर्वसंहारक शस्त्र पुरविण्याचा हा एक प्रकार असल्याचा ठपका क्लेमन यांनी ठेवला आहे. दरम्यान, याआधी अमेरिकी सिनेटर्सनी देखील चीनवर जैविक शस्त्राचा वापर केल्याचा आरोप केला होता. पण चीने हा आरोप फेटाळला होता.

leave a reply