ऑस्ट्रेलिया ने तैवानबाबत जपून प्रतिक्रिया द्यावी

- चीनच्या ऑस्ट्रेलियातील राजदूतांचा इशारा

प्रतिक्रियाकॅनबेरा – गेल्या आठवड्यात चीनच्या लष्कराने जपानच्या सागरी क्षेत्राजवळ क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी चीनच्या कारवाईवर जोरदार ताशेरे ओढले होते. यामुळे खवळलेल्या चीनने ऑस्ट्रेलियाला धमकावले आहे. इतर देशांच्या प्रभावाखाली येऊन ऑस्ट्रेलिया ने चीनविरोधी भूमिका स्वीकारू नये. याउलट तैवानबाबत ऑस्ट्रेलिया ने अधिक सावध भूमिका स्वीकारावी, असे ऑस्ट्रेलियातील चीनचे राजदूत शियाओ कियान यांनी बजावले आहे.

दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी स्थानिक रेडिओवाहिनीशी बोलताना, या क्षेत्रातील सुरक्षेला चीनकडून असलेला धोका वाढत असल्याचे म्हटले होते. यावेळी संरक्षणमंत्री मार्लेस यांनी तैवान आणि साऊथ चायना सीचा मुद्दा उपस्थित केला. तैवानच्या आखातात युद्धसरावांचे आयोजन करून चीनने जाणीवपूर्वक आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका मार्लेस यांनी ठेवला होता. या युद्धसरावात चीनने तैवानच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करून संयुक्त राष्ट्रसंघाचे नियम पायदळी तुडविल्याची टीका ऑस्ट्रेलियन संरक्षणंत्र्यांनी केली.

प्रतिक्रियातर साऊथ चायना सीच्या मुद्यावर मार्लेस चीनवर सडकून टीका केली. ईस्ट आणि साऊथ चायना सी क्षेत्रात नियमांवर आधारीत सागरी वाहतूक सुरू रहावी, यामध्ये ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय हित समावलेले आहे. पण या सागरी क्षेत्रातील चीनच्या कारवाया ऑस्ट्रेलियाची समृद्धी धोक्यात टाकणाऱ्या असल्याचा आरोप मार्लेस यांनी केला होता. बुधवारी ऑस्ेलियातील चीनचे राजदूत कियान यांनी माध्यमांशी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या तैवानबाबतच्या भूमिकेवर टीका केली. ऑस्ेलियन सरकारच्या या भूमिकेमुळे चीन आणि ऑस्ट्रेलियातील संबंधावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ‘वन चायना पॉलिसी’ गांभीर्याने घेऊन तैवानच्या मुद्यावर सावधपणे पावले टाकावी, असा इशाराच चीनच्या राजदूतांनी दिला.

दरम्यान, तैवानचे विलिनीकरण करण्यासाठी चीन सर्व पर्यायांचा वापर करण्यासाठी सज्ज असल्याची घोषणा चिनी राजदूत कियान यांनी केली. चीन तैवानवर लष्करी कारवाई करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना कियान यांनी अप्रत्यक्षपणे तैवानवर हल्ल्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply