साऊथ चायना सी क्षेत्रातील अमेरिकी विनाशिकेच्या गस्तीनंतर चीनचा गंभीर परिणामांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकी विनाशिकेने सलग दुसऱ्या दिवशी साऊथ चायना सीमधील ‘पॅरासेल आयलंड’ क्षेत्रात गस्त घातली. अमेरिकी नौदलाच्या या मोहिमेमुळे चीनचा भडका उडाला असून अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा चीनच्या संरक्षण विभागाने दिला. चीनच्या या इशाऱ्यावर अमेरिकेने प्रत्युत्तर दिले. साऊथ चायना सी क्षेत्रातील हक्कांबाबत करण्यात आलेले बेकायदेशीर दावे सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी मोठा धोका ठरतो, असे अमेरिकी नौदलाच्या प्रवक्त्यांनी बजावले. गेल्याच महिन्यात चीनच्या विमानाने तसेच विनाशिकेने साऊथ चायना सीमध्ये गस्त घालणाऱ्या अमेरिकी विमानाला ‘वॉर्निंग’ देण्याची घटना घडली होती.

साऊथ चायना सी क्षेत्रातील अमेरिकी विनाशिकेच्या गस्तीनंतर चीनचा गंभीर परिणामांचा इशारासाऊथ चायना सी’मधील ‘नाईन डॅश लाईन’च्या क्षेत्रावर चीनने आपला दावा सांगितला आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स व मलेशियाचे या सागरी तसेच हवाई क्षेत्रावरील हक्क चीनला अजिबात मान्य नाहीत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या मुद्यावर फिलिपाईन्सच्या बाजूने दिलेला निकालही चीनने पायदळी तुडविला आहे. त्याचबरोबर आपल्या परवानगीशिवाय कुठल्याही देशाच्या लष्करी तसेच प्रवासी विमानाने तसेच युद्धनौकांनी या क्षेत्रातून प्रवास करू नये, अशी ताकीद चीनने दिली आहे.

मात्र अमेरिकेसह मित्रदेशांनी चीनची वक्तव्ये धुडकावून गस्त मोहीम सुरूच ठेवली आहे. अमेरिकेच्या युद्धनौका गेल्या काही दिवसांपासून साऊथ चायना सीमध्ये सातत्याने गस्त घालत आहेत. गुरुवारी तसेच शुक्रवारी अमेरिकी नौदलाच्या सातव्या आरमाराचा भाग असलेल्या ‘युएसएस मिलिअस’ या विनाशिकेने साऊथ चायना सीमधील पॅरासेल आयलंड भागातून गस्त घातली. साऊथ चायना सी क्षेत्रातील अमेरिकी विनाशिकेच्या गस्तीनंतर चीनचा गंभीर परिणामांचा इशाराचीनकडून वारंवार ताकीद दिली जात असतानाही अमेरिकी विनाशिकेने सलग दोन दिवस साऊथ चायना सीमधून प्रवास करणे चीनला चांगलेच झोंबले आहे.

शुक्रवारी चीनच्या संरक्षण विभागाने अमेरिकेला गंभीर परिणामांचा इशारा दिला. ‘अमेरिकेच्या कारवाया साऊथ चायना सीमधील स्थैर्य व शांतता बिघडवित आहेत. अमेरिकी नौदलाची मोहीम चीनची सुरक्षा तसेच सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करते. सागरी क्षेत्रात अमेरिकेची एकाधिकारशाही वाढली असून त्यांच्या कारवाया साऊथ चायना सीचे लष्करीकरण करणाऱ्या ठरत आहेत. साऊथ चायना सी क्षेत्रातील अमेरिकी विनाशिकेच्या गस्तीनंतर चीनचा गंभीर परिणामांचा इशाराअमेरिकेने अशा कारवाया थांबवाव्यात अन्यथा एखाद्या अनपेक्षित दुर्घटनेतून गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे चीनच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते टॅन केफेई यांनी बजावले.

चीनच्या या इशाऱ्यावर अमेरिकेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘जगभरातील सागरी क्षेत्राच्या अधिकारांबाबत करण्यात येणारे अवास्तव दावे अमेरिका धुडकावून लावतो. दावे करणारे कोण आहेत याचा अमेरिकेला फरक पडत नाही’, असे अमेरिकी नौदलाच्या सातव्या आरमाराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल लुका बॅकिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी, अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे नवे बजेट हे चीनचा वाढता धोका रोखण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे, असा दावा केला.

 

leave a reply