‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनचा आशियातील प्रभाव घटला

ऑस्ट्रेलियाच्या ‘लोवी इन्स्टिट्यूट’चा अहवाल

Shanghai.china-jan.2021:,New,Covid-19,Cases,Have,Emerged,In,China.,Region,Hasकॅनबेरा/बीजिंग – कोरोना रोखण्यासाठी अत्यंत कठोरपणे राबविलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनचा आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील प्रभाव घटल्याचा अहवाल ऑस्ट्रेलियाच्या ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने दिला आहे. ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने प्रसिद्ध केलेल्या ‘आशिया पॉवर इंडेक्स’मध्ये चीन दुसऱ्या स्थानावर घसरल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेने या क्षेत्रात आपला प्रभाव पुन्हा वाढविल्याचे ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाने नमूद केले.

lowy asia power indexचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी ‘झीरो कोविड पॉलिसी’ लागू केली होती. त्याच्या यशाबाबत वारंवार प्रश्नचिन्हे उपस्थित होत असतानाही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व कम्युनिस्ट राजवटीकडून त्याचे समर्थन करण्यात आले होते. गेल्या वर्षी शांघाय व इतर प्रमुख शहरांमधून नाराजीचे सूर उमटत असतानाही जिनपिंग यांनी आक्रमक शब्दात आपल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र झिंजिआंगमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेने या धोरणाविरोधात चिनी जनतेत असलेला असंतोष तीव्रपणे उफाळून वर आला होता. चीनच्या प्रमुख शहरांमध्ये जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले होते.

Zero Covid Policyत्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चीनने कोरोनाची साथ रोखण्यासाठी लादलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनमधील बहुतांश निर्बंध उठविण्यात आले होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर चीनमधील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असून हॉस्पिटल्स व दफनभूमींमध्ये मोठ्या रांगा लागल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध होत आहेत. कोरोनामुळे दर दिवशी चीनमध्ये एक ते पाच हजार जण दगावत असल्याचे दावे विविध माध्यमांकडून करण्यात आले आहेत.

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चिनी जनतेला कोणत्याही प्रकारे संबोधित न करता गप्प राहण्याची भूमिका घेतल्याने चीनमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. चीनमधील वाढत्या कोरोना संसर्गाची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने(डब्ल्यूएचओ) चीनच्या यंत्रणांनी कोरोनासंदर्भातील आकडेवारी पुरवावी, असे निर्देश दिले आहेत. तर चिनी प्रवाशांना कोरोनासंदर्भातील चाचणी सक्तीची करणाऱ्या देशांमध्ये नव्या देशांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाच्या ‘लोवी इन्स्टिट्यूट’चा नवा अहवाल लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply