चीनची लढाऊ विमाने व विनाशिकांची तैवानजवळ गस्त

- एप्रिलच्या तीन दिवसात चीनच्या २८ विमानांची घुसखोरी

तैपेई – तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना चीनने तैवानच्या आखातातील घुसखोरी वाढविली आहे. चीनच्या पाच लढाऊ विमाने आणि चार विनाशिकांनी तैवानच्या आखातात गस्त घातली. त्याबरोबर तैवानने देखील प्रत्युत्तरादाखल आपली लढाऊ विमाने, विनाशिका रवाना केल्या. तसेच तैवानच्या लष्कराने आपली क्षेपणास्त्र यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

चीनची लढाऊ विमाने व विनाशिकांची तैवानजवळ गस्त - एप्रिलच्या तीन दिवसात चीनच्या २८ विमानांची घुसखोरीगेल्या आठवड्यात तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका व मध्य अमेरिकी देशांचा दौरा सुरू केला. त्यानंतर १ एप्रिलपासूनच चीनकडून तैवानच्या हवाई तसेच सागरी क्षेत्रात घुसखोरी सुरू केली होती. शनिवार ते रविवारच्या दरम्यान चीनची १० लढाऊ विमाने आणि तीन गस्तीनौकांनी तैवानच्या मीडियन लाईन पार केली. यामध्ये पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्सचा देखील समावेश होता. तर त्यानंतर रविवारी स्वतंत्रपणे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने विमानांचे आणखी एक पथक तैवानच्या दिशेने रवाना केले होते.

सप्टेंबर २०२० सालापासून चीनने तैवानच्याविरोधात ‘ग्रेझोन’ नीति स्वीकारल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत. जपानने वारंवार आवाहन करूनही अमेरिकेचे बायडेन प्रशासन चीनविरोधात भूमिका घ्यायला तयार नसल्याची टीका होत आहे.

leave a reply