लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या टोळ्यांविरोधात ब्रिटन टास्कफोर्स स्थापन करणार

- पंतप्रधान ॠषी सुनाक यांची घोषणा

लंडन – ब्रिटनमधील लहान मुले व तरुणींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये सहभागी असणाऱ्या टोळ्यांविरोधात आक्रमक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान ॠषी सुनाक यांनी ‘ग्रुमिंग गँग्ज्‌‍ टास्कफोर्स’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यात विशेष तज्ज्ञ असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असून हा फोर्स ग्रुमिंग गँग्ज्‌‍विरोधात पोलीसदलाला सहाय्य करेल. गेल्या काही वर्षात ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या विविध अहवालांमध्ये अशा टोळ्यांमध्ये पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांचा भरणा असल्याचे समोर आले होते. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही या मुद्यावर आग्रही भूमिका घेऊन लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमागे ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाच्या टोळ्या असल्याचे टीकास्त्र सोडले.

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या टोळ्यांविरोधात ब्रिटन टास्कफोर्स स्थापन करणार - पंतप्रधान ॠषी सुनाक यांची घोषणाब्रिटनचे माजी गृहमंत्री साजिद जाविद यांनाही, लहान मुले व महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमागे पाकिस्तानी वंशाचे गुन्हेगार असल्याचे मान्य करावे लागले होते. जाविद स्वतः पाकिस्तानी वंशाचे असूनही त्यांना द्याव्या लागलेल्या या कबुलीमुळे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या विद्यमान गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा उल्लेख करताना उघडपणे ब्रिटीश पाकिस्तानी असा उल्लेख केला आहे. लैंगिक शोषणाचे गुन्हे करणाऱ्यांबद्दल माहिती असतानाही त्यांच्या समाजातून अथवा एकूणच ब्रिटीश समाजातून त्यांना कोणी उघडपणे रोखताना दिसत नाही, याबद्दल गृहमंत्री ब्रेव्हरमन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लैंगिक शोषण व अत्याचारांच्या गुन्ह्यांकडे केलेली डोळेझाक, कारवाई करण्यात आलेले अपयश व बाळगलेले मौन यामुळे अशा गुन्ह्यांना अधिकच पाठबळ मिळत असल्याचा दावाही गृहमंत्र्यांनी केला. नव्या धोरणाअंतर्गत अशा गुन्हेगारांची माहिती असणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पोलीस या सर्वांनाच जबाबदार धरण्यात येणार असून कोणालाही आपले कर्तव्य टाळता येणार नाही, असे गृहमंत्री ब्रेव्हरमन यांनी बजावले. पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटीश नागरिकांची ही विकृती ब्रिटीश मूल्यांच्या विरोधात जाणारी असल्याचा ठपकाही ब्रेव्हरमन यांनी ठेवला.

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या टोळ्यांविरोधात ब्रिटन टास्कफोर्स स्थापन करणार - पंतप्रधान ॠषी सुनाक यांची घोषणा२०१४ साली प्राध्यापक अलेक्सिस जे यांनी सादर केलेल्या एका अहवालात, १९९७ ते २०१३ या काळात जवळपास दीड हजार लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे सांगण्यात आले होते. यात पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटीश नागरिकांचा उघडपणे उल्लेख करून सुरक्षायंत्रणांना त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘ग्रुमिंग गँग्ज्‌‍: ब्रिटन्स शेम’ नावाचा एक माहितीपटही प्रदर्शित झाला होता. यात पाकिस्तानी वंशाच्या टोळ्यांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.

गेल्या काही वर्षात ब्रिटनमधील अनेक माध्यमांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून लहान मुले तसेच तरुणींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा मुद्दा उठविण्यात येत आहे. २०१८ साली ब्रिटनमधील एका न्यायालयाने सात जणांना सामूहिक अत्याचार व लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले होते. हे सर्व आरोपी पाकिस्तानी वंशाचे होते. ब्रिटनमधील लोकप्रतिनिधी लारा चॅम्पियन यांनी पाकिस्तानी वंशाच्या टोळ्याच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करून खळबळ उडविली होती.

ब्रिटनमधील एका गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील ३९ टक्के गुन्हेगार पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश नागरिक असल्याचे म्हटले होते.

हिंदी English

 

leave a reply