युरोपिय देशांमधील सरकारी, लष्करी संकेतस्थळांवर चिनी हॅकर्सचे हल्ले

संकेतस्थळांवरमॉस्को – चीनमधील हॅकर्सनी लष्करी औद्योगिक प्रकल्प, संशोधन संस्था तसेच सरकारी आणि प्रशासकीय संकेतस्थळांवर सायबर हल्ले चढविले. पूर्व युरोपिय देश तसेच अफगाणिस्तानमधील संकेतस्थळांना चिनी हॅकर्सनी लक्ष्य केले. सायबर सुरक्षा पुरविणाऱ्या ‘कॅस्परस्की’ या कंपनीतील संशोधकांनी ही माहिती प्रसिद्ध केली.

सायबर हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चीनमधील ‘टीए428’ या चिनी भाषिक हॅकर गटाने हे सायबर हल्ले चढविले होते, अशी माहिती कॅस्परस्कीच्या संशोधकांनी दिली. या चिनी हॅकर्सनी बेलारूस, युक्रेन तसेच रशिया आणि अफगाणिस्तानातील संवदेनशील माहितीची चोरी केल्याचा आरोप रशियन संशोधकांनी केला. काही हल्ल्यांमध्ये चिनी हॅकर्स संबंधित कंपनीतील माहिती तंत्रज्ञ्ाानाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा भेदण्यात यशस्वी झ्ााल्याचा दावा कॅस्परस्कीच्या संशोधकांनी केला.

संबंधित देशांमधून चोरलेली ही माहिती हॅकर्सनी चिनी सर्व्हरवर फॉरवर्ड केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचे पुरावे असल्याचे कॅस्परस्कीचे संशोधक सांगत आहेत. याआधी चिनी हॅकर्सनी भारत, अमेरिका, युरोप, लॅटीन अमेरिकी देशांमध्ये सायबर हल्ले चढविले होते.

leave a reply