रशियन इंधनक्षेत्रावर नजर ठेवणाऱ्या चीनच्या गस्तीनौकेला व्हिएतनामने पिटाळले

हनोई – साऊथ चायना सीच्या संपूर्ण क्षेत्रावर आपला अधिकार असल्याचा दावा करणाऱ्या चीनने रशियाच्या इंधनक्षेत्रात घुसखोरी केल्याची घटना घडली आहे. चीनच्या तटरक्षकदलाच्या जहाजाने रशियाच्या इंधनक्षेत्राजवळून प्र्रवास करून त्यावर नजर ठेवली होती. आपल्या सागरी हद्दीतील चीनच्या या घुसखोरीमुळे संतापलेल्या व्हिएतनामने आपल्या विनाशिकांना रवाना केले. यानंतर चीनच्या जहाजाला माघार घेण्यास भाग पडले. पण यामुळे चीन रशियाच्या इंधनक्षेत्रावरही डोळा ठेवून असल्याचे दिसत आहे.

रशियन इंधनक्षेत्रावर नजर ठेवणाऱ्या चीनच्या गस्तीनौकेला व्हिएतनामने पिटाळलेव्हिएतनामने आपल्या सागरी हद्दीतील नैसर्गिक इंधनवायूच्या उत्खननासाठी मित्रदेशांना कंत्राट दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून रशियाने व्हिएतनामच्या अशाच दोन ब्लॉक्समध्ये उत्खनन सुरू केले आहे. पण संपूर्ण साऊथ चायना सीवर आपला अधिकार सांगणारा चीन रशियासह इतर देशांच्या इंधन क्षेत्रात घुसखोरी करीत असल्याचा आरोप व्हिएतनामने केला आहे. शनिवारी चीनच्या गस्तीनौकेने असा प्रकार केला. वेळीच आपल्या विनाशिकेला रवाना करून चीनच्या गस्तीनौकेला पिटाळून लावल्याची माहिती व्हिएतनामने दिली.

गेल्या वर्षभरात चीनच्या तटरक्षकदलाच्या जहाजाने रशियन इंधन क्षेत्रात किमान 40 वेळा घुसखोरी केली आहे. चिनी जहाजाच्या या कारवाया व्हिएतनाम आणि मित्रदेशांच्या हितसंबंधांसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप व्हिएतनामचे सरकार करीत आहे.

हिंदी

 

leave a reply