नवी दिल्लीत क्वांटम कॉम्प्युटिंगवर आधारलेली नेटवर्क लिंक सुरू

- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

नवी दिल्ली – टेलिकॉम व आयटी विभागाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजधानी नवी दिल्लीत क्वांटम कॉम्प्युटिंगवर आधारलेली दूरसंचार सेवा कार्यान्वित झाल्याची घोषणा केली. अशा स्वरुपाची देशातील ही पहिलीच टेलिकॉम सेवा असल्याचे वैष्णव म्हणाले. तसेच आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ‘चॅटजीपीटी’च्या धर्तीवर भारतात नवी घोषणा करण्यात येईल, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

राजधानी नवी दिल्लीत क्वांटम कॉम्प्युटिंगवर आधारलेली टेलिकॉम सेवा सुरू - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणासोमवारपासून नवी दिल्लीत ‘फर्स्ट इंटरनॅशनल क्वांटम कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह’ सुरू झाला आहे. यावेळी टेलिकॉम व आयटी विभागाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. दूरसंचार अर्थात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात फार मोठे फेरबदल होत असल्याचे यावेळी वैष्णव म्हणाले. राजधानी नवी दिल्लीत संचारभवन व ‘नॅशनल इर्न्फोमेटिक सेंटर’मध्ये (एनआयसी) क्वांटम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारलेले टेलिकॉम नेटवर्क सुरू झाले आहे, अशी माहिती यावेळी अश्विनी वैष्णव यांनी दिली. हे नेटवर्क अतिशय सुरक्षित आहे असून याच्या सुरक्षाविषयक चाचण्या सुरू असल्याचे यावेळी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

ही दूरसंचार सेवा सुरक्षित आहे की नाही, याची चाचपणी करण्यासाठी एथिकल हॅकिंग अर्थात कायदेशीररित्या हॅकिंगची प्रक्रिया करून सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी सहाय्य करणाऱ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात आहे, असे वैष्णव पुढे म्हणाले. यासाठी लवकरच इथे हॅकेथॉन स्पर्धा आयोजित केली जाईल व जो कुणी ही सिस्टीम हॅक करून दाखविल, त्याला दहा लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणाही यावेळी वैष्णव यांनी केली.

याबरोबरच केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी क्वांटम कॉम्प्युटिंग कंपन्यांनी भरविलेल्या प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. या क्षेत्रातील कंपन्यांनी भारतीय रेल्वेसाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ अर्थात प्रायोगिक पातळीवरील प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी वैष्णव यांनी केले. आर्टिफिशल तंत्रज्ञानावर आधारलेल्या ‘चॅटजीपीटी’च्या धर्तीवर लवकरच देशात सेवा सुरू होणार असल्याचे संकेत यावेळी अश्विनी वैष्णव यांनी दिले. मात्र याचे तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असताना, याबाबत अधिक महिती देता येणार नाही, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यासाठी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागेल, असे संकेत वैष्णव यांच्या विधानातून मिळत आहेत. दरम्यान, आर्टिफिशल टेक्नॉलॉजी अर्थात एआयवर आधारलेल्या चॅटजीपीटीची निर्मिती अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथील कंपनीने केली आहे. याला जगभरात अफाट प्रसिद्धी मिळाली असून विविध क्षेत्रासाठी याचा वापर सुरू झाला आहे. जगभरातील माध्यमांनी याची दखल घेतली असून तज्ज्ञांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत चॅटजीपीटीचा वापर करण्यात येत आहे. आपल्या देशातही एआय तंत्रज्ञानावर आधारलेली कम्युनिकेशन सिस्टीम तयार होणार असल्याचे संकेत देऊन केंद्रीय मंत्र्यांनी याबाबतचे कुतूहल वाढविले आहे.

हिंदी English

 

leave a reply