चीनच्या चार जहाजांची तैवानजवळून गस्त

तैपेई – गेल्या चोवीस तासात चीनच्या नौदलाच्या चार जहाजांनी आमच्या सागरी हद्दीजवळून गस्त घातल्याचा आरोप तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला. याबरोबर तैवानने देखील आपल्या विनाशिका रवाना करून चिनी जहाजांन माघार घेण्यास भाग पाडले. या महिन्यात चीनच्या 316 लढाऊ विमाने आणि 97 विनाशिकांनी तैवानच्या हवाई तसेच सागरी हद्दीजवळून प्रवास केल्याचा आरोप तैवान करीत आहे.

चीनच्या चार जहाजांची तैवानजवळून गस्तचीनने आपल्याविरोधात ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा वापर सुरू केल्याचा आरोप तैवान करीत आहे. यामुळे चीन थेट नाही अप्रत्यक्ष युद्ध सुरू करीत असल्याचा ठपका तैवानने ठेवला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून चीनने तैवानच्या सागरी क्षेत्रातील विनाशिका व विमानांची घुसखोरी वाढविली होती. या महिन्यातील चीनच्या विमाने व विनाशिकांची धोकादायक गस्त आधीच्या तुलनेत वाढल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, चीनला तैवानबरोबर थेट युद्ध छेडायचे नाही. तर ग्रे झोन वॉरफेअर किंवा सायबर हल्ल्यांद्वारे तैवानची कोंडी करायची असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

हिंदी

 

leave a reply