अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानच्या नौदलाचा क्षेपणास्त्रभेदी युद्धसराव

सेऊल – उत्तर कोरियाने द्रव इंधनावर आधारीत बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर पूर्व आशियात अधिकच तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाच्या नौदलांमध्ये संयुक्त क्षेपणास्त्रभेदी युद्धसराव पार पडला. उत्तर कोरियापासून वाढत असलेल्या क्षेपणास्त्रांच्या धोक्याला उत्तर देण्यासाठी हा सराव आयोजित केल्याचे दक्षिण कोरियन संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.

अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानच्या नौदलाचा क्षेपणास्त्रभेदी युद्धसरावकॉम्प्युटर आणि रडारने वेध घेतलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र भेदण्याचा सराव यावेळी पार पडला. जपान व दक्षिण कोरियामधील ‘ईस्ट सी’च्या क्षेत्रात हा सराव आयोजित करण्यात आला होता. या सरावात अमेरिकेची ‘युएसएस बेनफोल्ड’, दक्षिण कोरियाची ‘यु इगोक ईएल’ आणि जपानच्या नौदलाची ‘जेएस अटागो’ विनाशिका या सरावात सहभागी झाल्या होत्या. याआधी फेब्रुवारी महिन्यात तीनही देशांच्या नौदलात असाच सराव आयोजित केला होता.

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने द्रव इंधनावर आधारीत बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. एक हजार किलोमीटर पार केल्यानंतर सदर क्षेपणास्त्र ईस्ट सीमध्ये कोसळले होते. या चाचणीमुळे जपानमध्ये गोंधळ उडाला होता.

हिंदी

 

leave a reply