अमेरिका सिरियातून सैन्यमाघार घेणार नाही

- व्हाईट हाऊसची घोषणा

वॉशिंग्टन – सिरियातील अमेरिकेचे लष्करी तळ किंवा जवानांवर कितीही हल्ले झाले तरी अमेरिका या क्षेत्रातून माघार घेणार नसल्याची घोषणा व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केली. या क्षेत्रातील आपले जवान आणि हितसंबंधितांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे लष्कर सिरियात तैनात राहणार असल्याचे किर्बी यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर सिरिया व इराणने केलेल्या टीकेनंतर व्हाईट हाऊसने ही प्रतिक्रिया दिली.

अमेरिका सिरियातून सैन्यमाघार घेणार नाही - व्हाईट हाऊसची घोषणासिरियामध्ये अमेरिकेचे 900 जवान तैनात आहेत. सिरियाच्या ईशान्येकडील लष्करी तळांवर अमेरिकेची ही सैन्यतैनाती असल्याचा दावा केला जातो. सिरियातील इंधनसंपन्न भागात अमेरिकेने आपले तळ ठोकल्याचा आरोप सिरियन सरकार करीत आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले. यामध्ये एक कंत्राटदार ठार तर अमेरिकी जवान जखमी झाला. या हल्ल्यांचा संबंध इराणशी असल्याचा आरोप करून अमेरिकेने सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य केले. यामध्ये 19 जणांचा बळी गेल्यानंतर इराण व सिरियाने अमेरिकेवर जोरदार ताशेरे ओढले.

मात्र, काही झाले तरी अमेरिका सिरियातून सैन्यमाघार घेणार नसल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. सिरियातील अमेरिकी जवानांची तैनाती आवश्यक असल्याचा दावा किर्बी यांनी केला.

हिंदी

 

leave a reply