अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हत्येत ‘सीआयए’चा सहभाग

- डेमोक्रॅट पक्षातील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट केनेडी ज्यु. यांचा आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ज्यु.(जेएफके) यांच्या हत्येमागे गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चा सहभाग होता, असा आरोप रॉबर्ट एफ. केनेडी ज्यु. यांनी केला. रॉबर्ट एफ. केनेडी ज्यु. हे माजी राष्ट्राध्यक्ष ‘जेएफके’ यांचे पुतणे आहेत. रॉबर्ट एफ. केनेडी ज्यु. हे डेमोक्रॅट पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार म्हणून शर्यतीत असून त्यांनी गेल्याच महिन्यात प्रचारमोहिमेला सुरुवात केली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हत्येत ‘सीआयए’चा सहभाग - डेमोक्रॅट पक्षातील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट केनेडी ज्यु. यांचा आरोपएका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी आपले काका जॉन एफ. केनेडी ज्यु. तसेच आपले वडील रॉबर्ट एफ. केनेडी यांच्या हत्येत अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चा सहभाग होता, असा दावा केला. ‘सीआयए जॉन एफ. केनेडी ज्यु. यांच्या हत्येत तसेच सदर प्रकरण गुंडाळून टाकण्यात सहभागी असल्याचे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. या पुराव्यांबाबत शंका घ्यायला जागा नाही’, असे रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनिअर यांनी सांगितले. आपले वडील व माजी ॲटर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी यांच्या १९६८ साली झालेल्या हत्येमागेही सीआयएचा हात असल्याकडेे केनेडी ज्युनिअर यांनी लक्ष वेधले. युएस मरिन ली हार्वे ओस्वाल्ड याने २२ नोव्हेंबर, १९६३ रोजी डलासमध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ज्युनिअर यांच्यावर गोळी झाडली होती. ओस्वाल्डने कोणाच्याही मदतीशिवाय ही हत्या घडविल्याचा दावा अमेरिकी तपासयंत्रणा तसेच गुप्तचर यंत्रणांनी केला होता. ओस्वाल्डचा खटला सुरु होण्यापूर्वीच त्याचीही हत्या करण्यात आल्याने ‘जेएफके’ यांच्या हत्येचे गूढ अजूनही कायम राहिले आहे.

हिंदी

 

leave a reply