देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पावणे नऊ लाखांवर – हॉटस्पॉट असलेल्या शहरांमधून लॉकडाऊन

नवी दिल्ली/मुंबई – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पावणे नऊ लाखांवर पोहोचली आहे. तसेच या साथीने आतापर्यंत गेलेल्या बळींची संख्या २३ हजारांच्या पुढे गेली आहे. देशात चोवीस तासात २८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. देशभरात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत असताना राज्य सरकारांकडून हॉटस्पॉट असेलेले भाग आणि शहरांमध्ये अल्प कालावधीसाठी लॉकडाऊनचे नियम कडक केले जात आहेत. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १३ ते २३ मे पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या

शनिवारी देशात २८ हजारांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची रुग्णांची संख्या ८,४९,५५३ वर पोहोचली. रविवारी राज्यात सुमारे तितक्याच नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे विविध राज्यांकडून घोषित माहितीवरून स्पष्ट होते. महाराष्ट्रात चोवीस तासात १७३ जणांचा बळी गेला असून ७,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत १२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत दिवसभरात ६८ जणांचा बळी गेला, तर ४,२४४ नवे रुग्ण आढळले. एकट्या चेन्नईत ३२ जणांचा बळी गेला आहे. कर्नाटकात २६२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. उत्तरप्रदेशात १३९२, पश्चिम बंगालमध्ये १५६० आणि दिल्लीत १५७३ नवे रुग्ण आढळले.

या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये लॉकडाऊनचे शिथिल केलेले नियम मागे घेण्यात येत आहेत. तीन ते दहा दिवसांच्या कालावधीच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली आहे. अशारीतीने नव्याने लॉकडाऊन करणाऱ्या शहरांची आणि भागांची संख्या वाढत चालली आहे. उत्तर प्रदेश सरकारने दर शनिवार आणि रविवार लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नुकतीच बंगळुरूतही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा व्यापक लॉकडाऊन जाहीर झाला आहे. तामिळनाडूत मदुराई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरु झाला आहे. अरुणाचल प्रदेशने आपल्या राजधानीतील लॉकडाऊन एक आठवड्याने वाढविला आहे. बिहारमध्ये पटणा, भागलपूर, नालंदा, बेगुसराईमध्ये संचाराचे नियम कडक करण्यात आले आहेत.

leave a reply