२०२१ सालात उपासमारीचे संकट भयंकर असेल

- 'डब्ल्यूएफपी'चा इशारा

उपासमारीचे संकटसंयुक्त राष्ट्रसंघ – संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामने (डब्ल्यूएफपी) यावर्षीपेक्षा पुढील वर्षी उपासमारीचे संकटअधिक भीषण असू शकते, असा इशारा जागतिक नेत्यांना दिला आहे. वेळीच जगातिक नेत्यांनी या समस्येकडे लक्ष पुरविले नाही आणि सहाय्य दिले नाही, तर पुढील वर्षी भूकबळींची संख्या जास्त असेल असे ‘डब्ल्यूएफपी’चे डेव्हिड बेस्ले यांनी म्हटले आहे.

यावर्षी कोरोनाच्या संकटाने सऱ्या जगाला हादरून सोडले. मात्र या संकटाबरोबर जग भूकबळीच्या आव्हानाचा सामना करीत आहे, याकडे बेस्ले यांनी लक्ष वेधले. यासाठी त्यांनी एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालाचाही दाखल दिला. आताच यावर उपाययोजना केल्या नाहीत, तर काही महिन्याने स्थिती आणखी खराब होऊ शकते, असा दावा या अहवालात करण्यात आला होता.

उपासमारीचे संकट

२०२० मध्ये कोरोनाच्या संकट काळातही अंतरराष्ट्रीय समुदायाकडून संयुक्त राष्ट्राच्या ‘अन्न कार्यक्रमासाठी’ आर्थिक मदत मिळाली. मात्र सध्याची स्थिती पाहता २०२१ सालात अशी मदत मिळेल का? याबाबत बेस्ले यांनी शंका व्यक्त केली. कोरोना महामारीचे संकट आणखी दीडवर्ष तरी राहू शकते. या काळात अन्न संकटाचा सामना करण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता कमी असल्याची चिंता बेस्ले यांनी व्यक्त केली.

‘डब्ल्यूएफपी’ला यावर्षी नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार योग्य वेळी मिळाला आहे. यामुळे तरी ‘डब्ल्यूएफपी’ भूकबळी आणि अन्न समस्येच्या भयंकर संकटाकडे जागतिक नेत्याचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरेल, अशी अशा बेस्ले यांनी व्यक्त केली आहे.

leave a reply