डेन्मार्कचे लष्कर युद्धासाठी सज्ज नाही

- वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा दावा

कोपनहेगन – नाटोचा सदस्य देश व युरोपातील आघाडीच्या देशांपैकी एक असलेल्या डेन्मार्कचे लष्कर युद्धासाठी सज्ज नसल्याचा दावा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. युरोपमधील फिनलँड व स्वीडन यासारखे देश नाटोचे सदस्यत्व स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच नाटो सदस्य देशातील लष्करी अधिकाऱ्यांनी केलेले हे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

डेन्मार्कचे लष्कर युद्धासाठी सज्ज नाही - वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा दावा‘डेन्मार्कचे लष्कर युद्धसज्ज होण्यापासून अनेक वर्षे दूर आहे. लष्करात सैनिकांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवते आहे. परिस्थिती आणीबाणीची आहे. आपण गेले चार दशके लष्करात कार्यरत आहोत. मात्र सध्या इतकी वाईट परिस्थिती यापूर्वी कधीच पाहिली नव्हती’, असे डेन्मार्कच्या लष्करातील ब्रिगेडिअर जनरल हेन्रिक लिहन्‌‍ यांनी बजावले.

डेन्मार्कच्या लष्करातील 30 ते 35 जागा सध्या रिकाम्या आहेत. आता मोठी गुंतवणूक केली तरी त्याचे परिणाम दिसून येण्यात अनेक वर्षे जातील, असा दावाही ब्रिगेडिअर जनरल हेन्रिक यांनी केला. डेन्मार्कच्या लष्करातील आघाडीच्या लष्करी तुकड्यांनाच मनुष्यबळाची मोठी समस्या भेडसावत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

डेन्मार्कचे लष्कर युद्धासाठी सज्ज नाही - वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा दावारशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नाटोने युरोपातील लष्करी तैनाती व संरक्षण क्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. मात्र त्याचवेळी युरोपिय देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात व अविरत शस्त्रसहाय्य करण्याचा आग्रहही धरला आहे. यामुळे युरोपिय देश अडचणीत आले असून ब्रिटन, जर्मनीसह अनेक आघाडीच्या देशांनी संरक्षणदले पूर्णपणे सज्ज नसल्याची बाब समोर आणली आहे.

नाटो देश सज्ज नसतानाच फिनलँड व स्वीडनसारखे देश नाटोच्या सदस्यत्वासाठी हालचाली करीत असून येत्या काही महिन्यात त्यांना सदस्यत्व मिळेल, असा दावा नाटोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

leave a reply