अमेरिकी संरक्षणमंत्र्यांच्या इस्रायल दौऱ्यात इराणवरून तीव्र मतभेद

वॉशिंग्टन/जेरूसलेम – ड्रोन्सची निर्मिती आणि इंधनाच्या व्यवहारांशी संबंधित इराणच्या ३९ कंपन्यांवर अमेरिकेच्या कोषागार विभागाने नवे निर्बंध जाहीर केले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेत असताना इराणवरील या निर्बंधांची घोषणा करण्यात आली. तरीही या दौऱ्यात ऑस्टिन आणि नेत्यान्याहू यांच्यात मतभेद असल्याचे उघड झाले आहे. राजकीय वाटाघाटीद्वारे इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा सोडविता येऊ शकतो, असे ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. पण अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ पोहोचलेल्या इराणला रोखण्यासाठी लष्करी कारवाईशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे इस्रायल ठामपणे सांगत आहे.

अमेरिकी संरक्षणमंत्र्यांच्या इस्रायल दौऱ्यात इराणवरून तीव्र मतभेदगेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक युरेनियमच्या संवर्धनाजवळ इराण पोहोचल्याचे आयोगाने म्हटले होते. अवघ्या काही दिवसात इराण अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो, असे दावे लष्करी विश्लेषकांनी केले होते. इस्रायलने या मुद्यावर बोलण्याचे टाळले होते. इस्रायलचे वरिष्ठ नेते याबाबत अमेरिकाचा दौरा करून बायडेन प्रशासनाशी याबाबत चर्चा करणार होते. पण त्याआधीच अमेरिकेचे संरक्षणमंत्री तातडीने आखातात दाखल झाले.

इराक, इजिप्त व नंतर इस्रायलमध्ये दाखल झालेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू तसेच संरक्षणमंत्री योव गॅलंट यांची भेट घेतली. इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा सोडविण्यासाठी राजकीय पर्यायाचा वापर होऊ शकतो, असे ऑस्टिन यांनी सांगितले. २०१५ सालचा अणुकार्यक्रम पूनर्जिवित करण्याच्या आपल्या भूमिकेवर बायडेन प्रशासन ठाम असल्याचेही ऑस्टिन म्हणाले. पण इस्रायलचे संरक्षणमंत्री गॅलंट यांनी इराणबाबतच्या इस्रायलच्या भूमिकेत बदल शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

‘इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. इराणच्या अणुकार्यक्रमापासून असलेला धोका रोखण्यासाठी इस्रायल प्रत्येक कारवाईसाठी तयार आहे’, अशा शब्दात गॅलंट यांनी इराणवरील लष्करी कारवाईचे संकेत दिले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील इराणबरोबरच्या वाटाघाटी आणि अणुकराराला विरोध प्रदर्शित केल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकी संरक्षणमंत्र्यांच्या इस्रायल दौऱ्यात इराणवरून तीव्र मतभेदया अणुकरारामुळे इराण अण्वस्त्रसज्ज होणार नाही, अशी कुठलीही हमी मिळत नसल्याची आठवण पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी करुन दिली.

इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमावरील हल्ल्याची तयारी ठेवल्याच्या बातम्या याआधीच प्रसिद्ध झाल्या होत्या. इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी आपल्या हवाईदलाला इराणवरील हल्ल्याची सज्जता ठेवण्याचे आदेश दिले होते. अशा परिस्थितीत, इस्रायलला इराणवरील हल्ल्यापासून रोखण्यासाठी ऑस्टिन यांनी नेत्यान्याहू यांची भेट घेतली होती. पण अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांचा हा इस्रायल दौरा फिस्कटल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या कोषागार विभागाने गुरुवारी तातडीने इराणवर नव्या निर्बंधांची घोषणा केली. हाँगकाँग ते युएईपर्यंत शॅडो बँकिंगद्वारे व्यवहार करणाऱ्या इराणच्या कंपन्यावर कारवाई केल्याचे अमेरिकेच्या कोषागार विभागाने म्हटले आहे. पण या निर्बंधांनी इराणचा अणुकार्यक्रम रोखता येणार नसल्याच्या भूमिकेवर इस्रायल ठाम असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

हिंदी English

 

leave a reply