इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सौदी अरेबियामध्ये दाखल

रियाध – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी मंगळवारी सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये दाखल झाले. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. इजिप्त आणि सौदीमधील सहकार्य तसेच क्षेत्रीयआणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख चर्चा करणार असल्याची बातमी स्थानिक माध्यमे देत आहेत.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सौदी अरेबियामध्ये दाखलइजिप्तमधील सौदी अरेबियाचे राजदूत ओसामा नुगाली यांनी इजिप्तच्या पंतप्रधानांच्या सौदी भेटीची माहिती उघड केली. मंगळवारी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी विमानतळावर जाऊन इजिप्तच्या पंतप्रधानांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान सिसी आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यात स्वतंत्र चर्चाही पार पडली. यानंतर इजिप्तचे पंतप्रधान सौदीचे राजे सलमान यांची भेट घेणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे करार तसेच सामंजस्य करार होणार असल्याची माहिती सौदीचे राजदूत नुगाली यांनी दिली. दोन्ही देशांमधील धोरणात्मक तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चा पार पडेल. त्याचबरोबर क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही राजे सलमान आणि पंतप्रधान सिसी परपस्परांची भूमिका मांडतील, असे नुगाली यांनी स्पष्ट केले.

यामध्ये रशिया-युक्रेन संघर्ष आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांवरही सौदी व इजिप्तच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होईल, असा दावा इजिप्शियन दैनिकाच्या वरिष्ठ पत्रकाराने केला. रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम अरब-आखाती देशांवरही होत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत.

इजिप्तमध्ये धान्याच्या किंमती कडाडत चालल्या आहेत. तर अमेरिका व मित्रदेश सौदी अरेबिया व इतर अरब देशांवर इंधनाचे उत्पादन वाढविण्यावर दबाव टाकत आहेत. अशा परिस्थितीत इजिप्तच्या पंतप्रधानांनी सौदीला भेट दिली आहे.

leave a reply