एलॉन मस्क यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’चा ‘ट्विटर व्हेरिफाईड’चा शिक्का काढला

Twitter Verifiedवॉशिंग्टन – ट्विटर या सोशल नेटवकिग साईटचे प्रमुख एलॉन मस्क यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाला असलेला ‘ट्विटर व्हेरिफाईड’चा शिक्का काढून घेतला आहे. सदर अमेरिकी दैनिक वाचता येणार नाही इतक्या टोकाचा प्रचार करीत असल्याची टीकाही मस्क यांनी यावेळी केली. गेल्याच महिन्यात ट्विटरने एक एप्रिलपासून ‘लीगसी व्हेरिफाईड चेकमार्क्स’ काढण्यात येतील, असे जाहीर केले होते.

गेल्या वर्षी ट्विटरवर ताबा मिळविलेल्या एलॉन मस्क यांनी त्यात अनेक बदल करण्यास सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून ट्विटर अकाऊंटला मिळणाऱ्या ‘ब्ल्यू टिक’साठी ठराविक रक्कम भरावी लागेल, असे जाहीर करण्यात आले होते. याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून ‘न्यूयॉर्क टाईम्स’नेही पैसे भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे नियमानुसार सदर दैनिकाच्या ट्विटर अकाऊंटला असणारा शिक्का काढण्यात आल्याचे सांगण्यात येते. यावर प्रतिक्रिया देताना एलॉन मस्क यांनी न्यूयॉर्क टाईम्सकडून ट्विटरवर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट म्हणजे डायरिया असल्याची संभावना केली होती.

हिंदी 

leave a reply