कोरोनाच्या संकटानंतरही भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठेल

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातील मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्थेत हळूहळूगती पकडू लागली आहे. जगभरातून भारतात गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाकाळातही मोठे प्रकल्प भारतात आले आहेत. त्यामुळे २०२४ सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलेली असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान बोलत होते.

अर्थव्यवस्था

अचानक आलेल्या कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डगमगली होती. पण आता अर्थव्यवस्थेत सकारात्मक प्रगती दिसत आहे. पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाच्या संकटाच्या काळातला तूट भरुन निघेल. तसेच भारत गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम देश ठरेल,असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मकता येण्यासाठी पाच गोष्टी कारणीभूत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

देशातील कृषी क्षेत्र वेगाने पुढे जात आहे. गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेतले आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही देशात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) वाढ झाल्याचे पंतप्रधानांनी लक्षात आणून दिले.

एप्रिल ते ऑगस्ट महिनादरम्यान देशात ३५.७३ अब्ज डॉलर्स इतकी परकीय गुंतवणूक आली. हा आजवरचा विक्रम ठरतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही गुंतवणूक १३ टक्के जास्त आहे. ही गोष्ट भारतावर जगाचा विश्वास वाढत असल्याचे दाखवून देते. तसेच वाहनक्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रातही भारत प्रगती करीत आहे. रोजगारासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, याकडे पंप्रधानांनी लक्ष वेधले. या सर्व कारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत गती पकडू लागली आहे. यामुळे २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

leave a reply