नाटोतील सहभागानंतर फिनलँड व स्वीडन रशियन हल्ल्यांचे लक्ष्य ठरतील

- स्वीडनमधील रशियन राजदूतांचा इशारा

स्टॉकहोम/मॉस्को – ‘फिनलँड व स्वीडन हे दोन्ही देश नाटोचे सदस्य बनले की रशिया आणि नाटोमधील सीमा सध्यापेक्षा दुपटीने वाढेल. या देशांचा समावेश युरोपच्या सुरक्षेमध्ये सुधारणा घडवेल असे अनेकांना वाटते. मात्र नाटोतील सहभागानंतर फिनलँड व नाटो हे दोन्ही देश रशियाचे लक्ष्य ठरतील. यात लष्करी पातळीवरील हल्ल्यांचाही समावेश असेल’, असा इशारा स्वीडनमधील रशियाचे राजदूत व्हिक्टर तातारिन्तसेव्ह यांनी दिला.

नाटोतील सहभागानंतर फिनलँड व स्वीडन रशियन हल्ल्यांचे लक्ष्य ठरतील - स्वीडनमधील रशियन राजदूतांचा इशारागेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका व नाटोने युरोपिय देशांमधील संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी रशियाच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून स्वीडन व फिनलँड या देशांना नाटोच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला रशियाने कडाडून विरोध केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन्ही देशांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगून हे देश रशियन संरक्षणदलाचे लक्ष्य असतील, असे बजावले होते.

मात्र तरीही अमेरिका व नाटोने दोन्ही युरोपिय देशांना नाटोत सहभागी करून घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. नाटोतील सहभागानंतर फिनलँड व स्वीडन रशियन हल्ल्यांचे लक्ष्य ठरतील - स्वीडनमधील रशियन राजदूतांचा इशाराइतर नाटो सदस्य देशांनी फिनलँड व स्वीडनच्या समावेशाला मान्यता द्यावी म्हणून त्यांच्यावर दडपण टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे. तुर्की व हंगेरी यासारख्या देशांनी नाटो सदस्यत्वासाठी मान्यता द्यावी म्हणून धमकावण्यात आल्याचेही उघड झाले आहे. तरीही हंगेरीसारख्या देशाने स्वीडनला सदस्य देश म्हणून स्वीकारण्याचे नाकारले असून अधिक चर्चा करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला तुर्कीनेही आपला विरोध पूर्णपणे मावळला नसल्याचे संकेत दिले आहेत. युरोपात घडलेल्या काही घटनांचा मुद्दा उपस्थित करून तुर्कीने विरोध कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

हिंदी

 

leave a reply