फिनलँड नाटोचा सदस्य बनणार – नाटोच्या प्रमुखांची घोषणा

Flags,Of,Finland,And,Natoब्रुसेल्स – ‘मंगळवारपासून फिनलँड नाटोचा 31 वा सदस्य देश बनणार आहे. पहिल्यांदाच नाटोच्या लष्करी मुख्यालयात फिनलँडचा ध्वज फडकविला जाईल. फिनलँड तसेच नॉर्डिक देशांच्या सुरक्षेसाठी ही महत्त्वाची घटना ठरते’, अशी घोषणा नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी केली. फिनलँडमधील निवडणुकीत नाटो समर्थक पंतप्रधान सना मरिन यांचा पराभव झाला असून उदारमतवादी पेटेरी ऑर्पो यांचा विजय झाला आहे. त्यानंतर अवघ्या काही तासात नाटोच्या प्रमुखांनी केलेल्या या घोषणेतून फिनलँडला रशियाविरोधी गटात सामील करून घेण्याची अतिघाई दिसत आहे.

finland sana marin petteri orpoफिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी नाटोतील आपल्या देशाच्या सहभागासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते. डाव्या विचारसरणीच्या मरिन यांच्या या निर्णयामागे पाश्चिमात्य देशांची रशियाविरोधी भूमिका असल्याचे आरोप झाले होते. यावरुन फिनलँडमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पंतप्रधान मरिन यांना आपल्या नाटोपुरस्कृत विचारसरणीचा जबर फटका बसला. ऑर्पो यांच्या पक्षाने अटीतटीच्या लढतीत मरिन यांचा पराभव केला. देशाला आर्थिक आघाडीवर मजबूत करण्याच्या मुद्यावर ऑर्पो यांना पसंती मिळाल्याचा दावा केला जातो.

फिनलँडमधील या निकालाला काही तासही उलटत नाही तोच नाटोच्या प्रमुखांनी फिनलँडच्या सदस्यत्वाची घोषणा केली. मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्या उपस्थितीत फिनलँडचा नाटोत प्रवेश होईल, असे स्टोल्टनबर्ग यांनी जाहीर केले. त्याचबरोबर फिनलँडचा शेजारी स्वीडन देखील येत्या काही दिवसात नाटोचा सदस्य बनेल, असा दावा स्टोल्टनबर्ग यांनी केला.

हिंदी

leave a reply