जर्मनी इस्रायलकडून ‘ॲरो-थ्री’ क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करणार

Israel Germany Arrowबर्लिन – जर्मनीच्या सरकारने इस्रायलकडून ‘ॲरो-थ्री’ ही प्रगत क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा खरेदी करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. गेल्या काही वर्षांपासून जर्मनी व इस्रायलमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. अमेरिकेच्या ‘पॅट्रियॉट’कडे पाठ फिरवून जर्मनीने इस्रायलच्या ‘ॲरो’ला पसंती दिली आहे.

नाटोचा सदस्य देश असलेल्या जर्मनीने आपली लष्करी सज्जता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून जर्मनी आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या शोधात होती. नाटोचा सदस्य देश असल्यामुळे जर्मनीसमोर पॅट्रियॉट यंत्रणेचा पर्याय होता. अमेरिकेने देखील यासाठी लॉबिंग केल्याचा दावा केला जातो. पण आपल्या अचूक हवाई सुरक्षा यंत्रणांसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्रायलच्या ‘ॲरो-थ्री’ला जर्मनीने मंजूरी दिली.

ॲरो-थ्री ही यंत्रणा लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करू शकते. यामुळे जर्मनीची हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत होईल, असा दावा केला जातो.

leave a reply