रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियातील सोन्याच्या उत्पादनात वाढ

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या विविध निर्बंधांनंतरही रशियाने आपल्या सोन्याच्या उत्पादनात वाढ करण्यात यश मिळविल्याचे समोर येत आहे. २०२२ साली रशियाने आपल्या खाणींमधून ३२० टन सोन्याचे उत्पादन केले होते. त्यानंतर २०२३च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये उत्पादनात वाढ नोंदविण्यात आल्याचे ‘रोसस्टॅट’ या रशियन यंत्रणेकडून सांगण्यात आले. २०२२ सालच्या पहिल्या तिमाहिच्या तुलनेत २०२३ सालच्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या उत्पादनात नऊ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियातील सोन्याच्या उत्पादनात वाढरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर गेल्या वर्षी मार्च महिन्यात रशियाने सोन्याच्या खरेदीवरील ‘व्हॅट’ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रशियन नागरिकांकडून सोन्यात होणारी गुंतवणुकही वाढली आहे. गेल्या वर्षभरात रशियन नागरिकांनी ७५ टन सोन्याची खरेदी केल्याचे समोर आले. रशियन जनतेकडून मागणीत वाढ झाल्याने रशियन कंपन्यांनीही सोन्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे सोन्याच्या उत्पादनात जागतिक स्तरावरील दुसरे स्थान रशियाने कायम राखले आहे.

२०२२ साली सोन्याचे एकूण उत्पादन ३,६१२ टन झाले असून २०२१ सालच्या तुलनेत त्यात एक टक्क्याने वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियातील सोन्याच्या उत्पादनात वाढ२०२२ सालातील उत्पादन हा २०१८ सालानंतरचा उच्चांक असल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिली आहे. सोन्याच्या उत्पादनात वाढ करतानाच रशियाच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याच्या राखीव साठ्यांमध्येही भर टाकणे सुरू ठेवले असून देशातील राखीव सोन्याचा साठा २,२९८ टनांवर जाऊन पोहोचला आहे.

दरम्यान, २०२३ साली रशियाची अर्थव्यवस्था ४.५ ते ६.५ टक्क्यांनी प्रगती करेल, असा विश्वास रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्यक्त केला. तर २०२४ साली रशियाचा विकासदर चार टक्के असेल, असे भाकितही करण्यात आले आहे.

हिंदी English

 

leave a reply