सरकार पर्यटनावर पुन्हा निर्बंध आणू शकते

- पर्यटनस्थळांवर उसळलेल्या गर्दीनंतर केंद्र सरकारचा इशारा

नवी दिल्ली – कोरानाची दुसरी लाट अजून पुर्णपणे गेलेली नाही. मात्र नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. थंड हवेच्या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी वाढली आहे व येथे कोणीही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही. हे असेच चालू राहिले, तर सरकार पर्यटनावर पुन्हा निर्बंध आणू शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

सरकार पर्यटनावर पुन्हा निर्बंध आणू शकते - पर्यटनस्थळांवर उसळलेल्या गर्दीनंतर केंद्र सरकारचा इशारामंगळवारी आरोग्य विभागाची नियमित पत्रकार परिषद पार पडली. देशात आतापर्यंत लसींचे 35.7 लाख डोस देण्यात आले आहेत. तसेच गेल्या तीन महिन्यातील एका दिवसात कोरोनाने गेलेल्या मृत्यूचीं सर्वाधिक कमी नोंद झाली आहे. मंगळवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात 553 जणांना कोरोनाने बळी गेला, तर 34 हजार 703 नवे रुग्ण आढळले. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.17 टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

यावेळी अग्रवाल यांनी पर्यटन स्थळांवर विशेषत: थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांच्या उसळलेल्या गर्दीवर व तेथे होणार्‍या कोरोना नियमांच्या उल्लंघनावर चिंता व्यक्त केली. कोरोनाचे निर्बंध शिथील होताच पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. सर्व हॉटेल्स भरलेली असून पर्यटक कोणत्याही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

यामुळे कोरोनाचे संक्रमण पुन्हा फैलावण्याचा धोका आहे. याबाबतचे अहवाल समोर आल्यावर अग्रवाल यांनी स्पष्ट शब्दात पर्यटनावरील निर्बंध पुन्हा कडक करावे लागतील, असा इशारा दिला आहे. कोरोना आता गेला अशा पद्धतीत पर्यटक वावरत आहेत, हे योग्य नाही, असे आयसीएमआयरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. हिमाचल प्रदेशात सुमारे 6 ते 7 लाख पर्यटकांनी गर्दी केल्याच्या बातम्या आहेत.

leave a reply