गाझापट्टीतून हमास, इस्लामिक जिहादचे इस्रायलवर रॉकेट हल्ले

- जेरूसलेम, वेस्ट बँकमध्ये तणाव

जेरूसलेम – गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी मंगळवारच्या रात्री इस्रायलवर १८ रॉकेट्सचा मारा केला. प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या लष्कराने बुधवारी सकाळी गाझातील हमासच्या दोन ठिकाणांना लक्ष्य केले. यानंतर गाझातील दहशतवादी संघटनांनी पॅलेस्टिनींना जेरूसलेममधील प्रार्थनास्थळात जमा होण्याचा संदेश दिला होता. यामुळे जेरूसलेम आणि वेस्ट बँकमधील तणाव अधिकच वाढला आहे.

गाझापट्टीतून हमास, इस्लामिक जिहादचे इस्रायलवर रॉकेट हल्ले - जेरूसलेम, वेस्ट बँकमध्ये तणावमंगळवारी संध्याकाळी जेरूसलेममधील प्रार्थनास्थळाच्या आवारात पॅलेस्टिनी कट्टरपंथी आणि इस्रायली सुरक्षा जवानांमध्ये संघर्ष भडकला. यावेळी कट्टरपंथियांनी इस्रायली जवानांवर स्टन ग्रिनेड्स आणि दगडांचा मारा केला. यानंतर बुधवार सकाळपर्यंत जेरूसलेमच्या रस्त्यांवर कट्टरपंथियांकडून इस्रायली जवानांवर हल्ले सुरू होते. इस्रायली लष्कराने केलेल्या कारवाईत चारशेहून अधिक जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते.

इस्रायलने केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त करून गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर रॉकेट्सचा मारा केला. यातील एक रॉकेट कारखान्याच्या परिसरात कोसळले. तर इतर रॉकेट्स इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने यशस्वीरित्या भेदले. गाझापट्टीतून हमास, इस्लामिक जिहादचे इस्रायलवर रॉकेट हल्ले - जेरूसलेम, वेस्ट बँकमध्ये तणावयानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझातील हमासच्या दोन रॉकेट प्रक्षेपण तळांना लक्ष्य केले. यानंतर इस्रायलने गाझापट्टी तसेच वेस्ट बँकच्या सीमेवरील आपल्या सुरक्षादलांसाठी अलर्ट जारी केला आहे. बुधवारी संध्याकाळी ज्यूधर्मिय आणि पॅलेस्टिनी आपला महत्त्वाचा सण साजरा करणार आहेत. त्याआधी हा संघर्ष भडकल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. दोन वर्र्षांपूर्वी बरोबर याच मुद्यावरुन जेरूसलेममध्ये संघर्ष भडकला होता आणि हमासच्या चिथावणीनंतर जेरूसलेममध्ये मोठी गर्दी जमली होती. यानंतर गाझापट्टीतून हमासने सलग ११ दिवस इस्रायलवर हजारो रॉकेट्सचे हल्ले चढविले होते. आत्ता देखील हमासने वेस्ट बँकमधील आपल्या समर्थकांना अशीच गर्दी करण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वीप्रमाणे हमास पुन्हा एकदा इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव करण्याच्या तयारीत असल्याची दाट शक्यता समोर येत आहे.

हिंदी

 

leave a reply