अमेरिका इराणबरोबर अंतरिम अणुकरार करण्याच्या तयारीत

- अमेरिकी वृत्तसंस्थेच्या दाव्यानंतर इस्रायलचे मोसादला सज्जतेचे आदेश

वॉशिंग्टन/जेरूसलेम – इराणकडे ८७.५ किलो वजनाचा संवर्धित युरेनियमचा साठा असल्याचे उघड झाल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन या इराणशी अणुकरारावर करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच बायडेन प्रशासन इराणबरोबर अंतरिम अणुकरार करील, अशी धक्कादायक बातमी अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन कुठलीही किंमत मोजायला तयार आहेत, अशी बातमी अमेरिकेच्या एका वृत्तसंस्थेने दिदली. त्या पार्श्वभूमीवर, इस्रायलने इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्याची तयारी केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

अमेरिका इराणबरोबर अंतरिम अणुकरार करण्याच्या तयारीत - अमेरिकी वृत्तसंस्थेच्या दाव्यानंतर इस्रायलचे मोसादला सज्जतेचे आदेशअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तेवर आल्यापासून इराणबरोबरचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. इस्रायल तसेच सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या इशाऱ्यांकडे बायडेन प्रशासनाने डोळेझाक केली होती. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे अणुकराराच्या वाटाघाटी मागे पडल्याचे बोलले जात होते. एका प्रचारसभेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबरोबरच्या वाटाघाटी सध्या गुंडाळल्याचे जाहीर केले होते. पण पुढच्याच दिवशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणबरोबरच्या अणुकरारापासून माघार घेतली नसल्याचा खुलासा केला.

आता बायडेन प्रशासन इराणबरोबर अंतरिम अणुकरार करणार असल्याचा दावा अमेरिकेतील ‘एक्सिऑस’ या वृत्तसंस्थेने केला आहे. यानुसार, इराणवरील निर्बंध शिथिल केले जातील. तसेच २०१५ सालच्या कराराप्रमाणे अणुकार्यक्रमातील युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या मोबदल्यात इराणला आर्थिक सवलती दिल्या जातील. बायडेन प्रशासनाने जानेवारी महिन्यात याची तयारी सुरू केली होती. तर फेब्रुवारी महिन्यात युरोपिय मित्रदेश आणि इस्रायलमधील आपल्या सहकाऱ्यांना याची कल्पना दिली होती.

अमेरिका इराणबरोबर अंतरिम अणुकरार करण्याच्या तयारीत - अमेरिकी वृत्तसंस्थेच्या दाव्यानंतर इस्रायलचे मोसादला सज्जतेचे आदेशअमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबरोबर असाच अंतरिम करार केला होता. सहा महिन्यांच्या मुदतीनंतर दरवेळेस ओबामा प्रशासनाने हा करार पुनर्जिवित केला होता. पुढे २०१५ सालच्या सप्टेंबर महिन्यात ओबामा प्रशासनाने इराणबरोबर अंतिम अणुकरार केला होता, याची आठवण या वृत्तसंस्थेने करुन दिली. पण यानंतरही इराणचा अणुकार्यक्रम धोकादायकरित्या अण्वस्त्रनिर्मितीजवळ पोहोचल्याच्या बातम्या येत होत्या. राष्ट्राध्यक्ष बायडेन देखील ओबामा प्रशासनाच्याच धोरणांची पुनरावृत्ती करीत असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर, इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ न देण्यासाठी आखलेल्या योजना कार्यान्वित करण्याची तयारी ठेवा, असे आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी गुप्तचर संस्था मोसादला दिले आहेत. ‘आपण इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखले नाही तर त्यानंतरचे वास्तव फारच वेगळे असेल. इस्रायलच्या विनाशाची धमकी देणारा इराण साऱ्या जगाला वेठीस धरू शकतो’, असे नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा अंतरिम करार इराणच्या अणुकार्यक्रमावरील हल्ल्यापासून इस्रायलला रोखू शकत नाही, अशा शब्दात इस्रायलच्या पंतप्रधानांनी बायडेन प्रशासनाला बजावले आहे.

हिंदी English

 

leave a reply