म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाईहल्ल्यात शंभर जणांचा बळी

- दोन वर्षातील सर्वात भीषण हल्ला असल्याचा दावा

यांगून – म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाईहल्ल्यात किमान 100 जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी उत्तर म्यानमारमधील सागैंग प्रांतात जुंटा राजवटीच्या विरोधात आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान हा हल्ला करण्यात आला. म्यानमारच्या सत्ताधारी जुंटा राजवटीने हल्ल्याची कबुली दिली आहे. जुंटा राजवटीने सत्ता हाती घेतल्यानंतर केलेल्या हल्ल्यांमधील हा सर्वाधिक भीषण हल्ला ठरतो. संयुक्त राष्ट्रसंघटनेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला आहे.

म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाईहल्ल्यात शंभर जणांचा बळी - दोन वर्षातील सर्वात भीषण हल्ला असल्याचा दावाउत्तर म्यानमारमधील सागैंग प्रांताचा भाग असलेल्या पझिगी गावात ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’च्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जवळपास दीडशे जण उपस्थित होते. यात स्त्रिया व मुलांचाही समावेश होता. कार्यक्रमाला सुरुवात होत असतानाच सकाळी आठच्या सुमारास एका लढाऊ विमानाने गावावर जोरदार बॉम्बवर्षाव केला. त्यानंतर अर्ध्या तासाने लष्कराच्या हेलिकॉप्टरने कार्यक्रमाच्या जागेवर जोरदार गोळीबार केला. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांमध्ये जवळपास 100 जणांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये किमान 30 मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रमासाठी जुंटा राजवटीच्या विरोधात स्थापन झालेल्या नागरी तसेच बंडखोर गटांचे स्थानिक नेते व सदस्यही उपस्थित होते. म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाईहल्ल्यात शंभर जणांचा बळी - दोन वर्षातील सर्वात भीषण हल्ला असल्याचा दावात्यांचाही हल्ल्यात बळी गेल्याची माहिती स्वयंसेवी गटांनी दिली. म्यानमारच्या जुंटा राजवटीने गेल्या दोन वर्षात केलेला हा सर्वात मोठा व भीषण हल्ला असल्याचा दावा लोकशाहीवादी गटांनी केला आहे.

म्यानमारच्या लष्कराने या हल्ल्याची कबुली दिली. म्यानमारच्या जुंटा राजवटीविरोधात स्थापन झालेल्या ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’च्या वतीने जनतेला भडकविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या जागी सशस्त्र बंडखोर गटांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवण्यात आला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन म्यानमारच्या लष्कराने हवाईहल्ला केल्याचे जुंटा राजवटीचे प्रवक्ते मेजर जनरल झाव मिन तुन यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रसंघटनेसह अमेरिका व इतर देशांनी या हल्ल्यांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.

म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाईहल्ल्यात शंभर जणांचा बळी - दोन वर्षातील सर्वात भीषण हल्ला असल्याचा दावाम्यानमारच्या लष्कराने 2021 सालच्या फेब्रुवारी महिन्यात बंड करून लोकशाहीवादी नेत्यांना ताब्यात घेतले होते. यामध्ये म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सॅन स्यू की यांच्यासह 400हून अधिक नेते व अधिकाऱ्यांचा समावेश होता. या कारवार्ईनंतर देशभरात जोरदार निदर्शने सुरू झाली होती. मात्र म्यानमारच्या लष्कराने हिंसा व दडपशाहीचा वापर करून निदर्शने मोडून काढली. असे असले तरी जुंटा राजवटीविरोधातील आंदोलन अद्यापही सुरू आहे.

म्यानमारमधील लोकशाहीवादी राजकीय गटांनी एकत्र येऊन ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ची स्थापना केली. या सरकारला देशाच्या विविध भागांमध्ये सक्रिय असणाऱ्या सशस्त्र बंडखोर गटांचीही साथ आहे. त्यामुळे म्यानमारवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात जुंटा राजवटीला अद्यापही यश आलेले नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून आंदोलन पूर्णपणे चिरडून एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ व समर्थकांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. मंगळवारी झालेला भीषण हवाईहल्ला त्याचाच भाग ठरतो.

हिंदी

 

leave a reply