अमेरिकेने आखाती क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे टाळावे

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

तेहरान – ‘आखातातील अमेरिकेचा प्रभाव क्षीण होत चालला असून या क्षेत्रात नवी व्यवस्था स्थापित होत आहे. अशा परिस्थितीत पाणबुडी, विनाशिका आणि बॉम्बर्स विमाने रवाना करून अमेरिका युद्धखोरी करीत आहे. यामुळे अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव वाढणार नाही. त्यामुळे अमेरिकेने या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे कटाक्षाने टाळावे’, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. त्याचबरोबर इस्रायलच्या बचावासाठी अमेरिकेने पश्चिम आशिया आणि पर्शियन आखातात ढवळाढवळ करण्याचे सोडून द्यावे, असेही इराणने बजावले.

अमेरिकेने आखाती क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे टाळावे - इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारागेल्या काही आठवड्यांपासून सौदी अरेबिया आणि इराण संबंध सुरळीत करण्यासाठी वेगाने हालचाली करीत आहेत. गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये सौदी व इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये पहिली बैठक पार पडल्यानंतर लवकरच दूतावास सुरू करण्याचे घोषणा दोन्ही देशांनी केली. चीनच्या मध्यस्थीमुळे सौदी-इराणमध्ये सहकार्य प्रस्थापित होत असून इराण युएई, बाहरिन या इतर अरब मित्रदेशांबरोबरही संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेल्या महिन्याभरातील या घडामोडींमुळे चीनचा आखातातील प्रभाव वाढल्याचा दावा अमेरिकेतील नेते तसेच आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

गेल्याच वर्षी चीनने सौदी व इतर अरब मित्रदेशांबरोबरचे सहकार्य व्यापक करण्यासाठी मोठी घोषणा केली होती. त्याचबरोबर चीन व आखाती देशांनी डॉलरवर आधारीत इंधनाचा व्यापार ‘युआन’मध्ये करण्याचे संकेत दिले आहेत. बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकेने सौदी व अरब मित्रदेशांचा विश्वास गमावला आहे. अशा परिस्थितीत चीनची आखातातील ‘एन्ट्री’ आणि इंधनातील व्यवहारातून अमेरिकेच्या डॉलरला वजा करून चीनच्या युआनला मिळणारी पसंती म्हणजे, us floridaअमेरिकेचा आखातातील प्रभाव कमी झाल्याचे दाखवून देते, अशी टीका अमेरिकन नेते करीत आहेत.

अशा परिस्थितीत गेल्याच आठवड्यात अमेरिकेने पर्शियन आखातासाठी ‘युएसएस फ्लोरिडा’ ही आण्विक पाणबुडी रवाना केली. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पहिल्यांदाच १५४ टॉमाहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या या पाणबुडीच्या आखातातील तैनातीची माहिती जाहीर केली. तसेच या क्षेत्रातील अमेरिका व मित्रदेशांच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असल्याचे जाहीर केले. अमेरिकेच्या या तैनातीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार टीका केली.

अमेरिकेने आखाती क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे टाळावे - इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारापर्शियन आखातात आण्विक पाणबुडीची तैनाती करुन अमेरिका युद्धखोरी करीत असल्याचा आरोप इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कानी यांनी केला. तसेच या क्षेत्रातील क्षीण होणारा आपला प्रभाव नव्याने प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने ही तैनाती केल्याचा दावा कानी यांनी केला. पण या तैनातीमुळे अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव वाढणार नसल्याचे कानी म्हणाले. आखातात नवी व्यवस्था प्रस्थापित झाली असून अमेरिकेने हे सत्य स्वीकारावे, असा टोला इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लगावला.

दरम्यान, अमेरिकेच्या इराणविषयक भूमिकेवर इस्रायलनेही चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचा पाठिंबा नसला तरी इस्रायल इराणवर हल्ले चढविल, अशी घोषणा इस्रायलने केली होती. पण अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय इस्रायल इराणच्या सामर्थ्यासमोर अतिशय छोटा ठरेल, असा दावा इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अब्दोलरहीम मुसावी यांनी केला.

leave a reply