चीनच्या विस्तारवादाचा मुकाबला करताना लोकशाहीवादी भारताचे अनुकरण करा

- चीनमधील माजी विद्यार्थी नेत्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

नवी दिल्ली/बीजिंग – चीनच्या विस्तारवादी धोरणांचा मुकाबला करताना भारताने जी पावले उचलली त्याचे अनुकरण जगाने करायला हवे, असे आवाहन चीनमधील माजी विद्यार्थी नेत्याने केले. तीन दशकांपूर्वी चीनमध्ये झालेल्या ‘तिआनानमेन स्क्वेअर’ आंदोलनात विद्यार्थ्यांचे नेतृत्व केलेल्या ‘झोऊ फेंगसुओ’ यांनी एका वेबिनारला संबोधित करताना हा सल्ला दिला. यावेळी फेंगसुओ यांनी, भारताची प्रशंसा करताना पुढील काळातही चीनविरोधात लोकशाहीवादी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील, असा दावाही केला.

चीनचा विस्तारवादाचा मुकाबला करताना लोकशाहीवादी भारताचे अनुकरण करा - चीनमधील माजी विद्यार्थी नेत्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहनभारतातील ‘लॉ अँड सोसायटी अलायन्स’ व ‘डिफेन्स डॉट कॅपिटल’ या अभ्यास गटाने नुकतेच एका वेबिनारचे आयोजन केले होते. ‘एम्परर हॅज नो क्लोथ्स:चायना अंडर शी जिनपिंग’ नावाच्या या वेबिनारमध्ये चीनमधील माजी विद्यार्थी नेता फेंगसुओ, युरोपमधील तिबेटच्या प्रतिनिधी ‘थिनले चुक्की’ व पत्रकार आदित्य राज कौल सहभागी झाले होते. यावेळी फेंगसुओ यांनी, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा उल्लेख ‘मॉन्स्टर’ असा करून त्यांची महत्त्वाकांक्षा संपूर्ण जगावर ताबा मिळवण्याची आहे असा आरोप केला.

चीनचा विस्तारवादाचा मुकाबला करताना लोकशाहीवादी भारताचे अनुकरण करा - चीनमधील माजी विद्यार्थी नेत्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन‘राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना दुसरा माओ बनण्याची इच्छा असून, चीनचा विस्तार करण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळेच भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भारताला चीनमधील एकतंत्री हुकूमशाही राजवटीचा मुकाबला करावा लागत असून, जिनपिंग यांच्या चीनला रोखण्यासाठी तीन मुद्दे महत्त्वाचे ठरतील. भारताने तैवान, हॉंगकॉंगमधील सुरक्षा कायदा आणि इंटरनेट क्षेत्रातील चीनची फायरवॉल या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेऊन याविरोधात सुरू असलेल्या लढ्याला बळ देणे आवश्यक आहे’, असे आवाहन फेंगसुओ यांनी केले. तिबेटच्या प्रतिनिधी ‘थिनले चुक्की’ यांनीही, चीनच्या कारवायांची माहिती देताना तिबेटमधील वंशसंहारावरून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर आरोप केले.

‘चीनने १२ लाख तिबेटी नागरिकांचे हत्याकांड केले असून, सहा हजारांहून अधिक प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली आहेत. मानवा ते कारण अंतर्गत येणारे सर्व हक्क चीनच्या राजवटीने पायदळी तुडविले आहेत’, अशी टीका चुक्की यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून सुरू असणार्‍या वर्चस्ववादी कारवायांविरोधात जगभरात तीव्र असंतोष आहे. अमेरिका व युरोपसह आशियाई देशही चीनविरोधात उघडपणे समोर येत असून चीनच्या सत्ताधारी राजवटीचा खरा चेहरा जगासमोर उघड होऊ लागला आहे. या राजवटीचे अत्याचार अनुभवलेल्या फेंगसुओ व ‘थिनले चुक्की’ यांच्या वक्तव्यातून त्याला दुजोरा मिळताना दिसत आहे.

leave a reply