जपानकडून रशियन इंधनाची आयात सुरू

Russian-fuelमॉस्को/टोकिओ – युरोप खंडातील देश रशियन इंधनाची आयात बंद करण्याचे संकेत देत असतानाच जपानने रशियन इंधनाची आयात पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. जपान आपल्यामागणीपैकी जवळपास १० टक्के इंधन रशियाकडून आयात करतो. रशियाच्या अतिपूर्वेकडील इंधनप्रकल्पांमध्ये जपानी कंपन्यांची मोठी भागीदारीदेखील आहे. असे असतानाही पाश्चिमात्य देशांच्या दबावाखाली जपानने रशियन इंथन आयातीवर निर्बंध लादले होते.

Import-Russian-fuelरशिया हा जगातील आघाडीच्या इंधन उत्पादक व निर्यातदार देशांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतो. जागतिक बाजारपेठेत या देशाचा वाटा सुमारे १० टक्क्यांच्या आसपास आहे. रशियाच्या प्रमुख आयातदार देशांमध्ये युरोपिय देशांसह चीन व जपान हे देश आघाडीवर आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमध्ये युरोपिय देशांसह जपानदेखील सहभागी झाला होता.

मात्र इंधनाचे वाढते दर व महागाई या पार्श्वभूमीवर जपानने आपला निर्णय बदलला आहे. नजिकच्या काळात रशियाकडून पुन्हा एकदा इंधनाची आयात सुरू करण्याचे जपानकडून सांगण्यात आले. जून महिन्यात जपानने रशियाकडून शून्य इंधनआयात केली होती. या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा ठरतो. काही दिवसांपूर्वीच रशियाकडून जपानला होणारी एकूण इंधन निर्यात ४६ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले होते.

leave a reply