जर्मनीची लढाऊ विमाने इंडो-पॅसिफिकमध्ये दाखल

इंडो-पॅसिफिकमध्ये दाखलबर्लिन – जर्मनीच्या लढाऊ विमानांचा ताफा पहिल्यांदाच इंडो-पॅसिफिकमध्ये दाखल झाला आहे. सिंगापूर आणि ऑस्ेलियन संरक्षणदलांबरोबरच्या युद्धसरावासाठी जर्मनीची लढाऊ विमाने पुढील महिनाभर या क्षेत्रात तैनात असतील. यापैकी ऑस्ेलियाबरोबरचा जर्मनीचा युद्धसराव चीनला इशारा देणारा असल्याचा दावा केला जातो. दरम्यान, गेल्या वर्षी जर्मनीच्या विनाशिकेने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात गस्त घातल्यानंतर चीनने धमकावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व जर्मनीतील या युद्धसरावावर चीनची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

जर्मनीच्या संरक्षणमंत्री ख्रिस्तीन लँब्रेश यांनी माध्यमांशी बोलताना इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील या सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. युक्रेनमधील युद्ध प्राधान्यक्रमावर असून त्याकडे लक्ष केंद्रीत आहे. असे असले तरी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांकडे जर्मनीचे दुर्लक्ष झालेले नाही व यासाठी जर्मनीची लढाऊ विमाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी रवाना झाली आहेत’, असे संरक्षणमंत्री लँब्रेश म्हणाल्या. मंगळवारी उशीरा सिंगापूर येथे दाखल झालेली जर्मनीची विमाने 9 सप्टेंबरपर्यंत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सराव करणार आहेत.

इंडो-पॅसिफिकमध्ये दाखलजर्मनीच्या 13 विमानांचा ताफा सिंगापूरमध्ये उतरला असून यामध्ये सहा युरोफायटर लढाऊ विमाने, चार ए400एम बहुउद्देशीय विमाने आणि तीन ए330 इंधनवाहू विमानांचा समावेश आहे. जर्मनीतून उड्डाण केलेल्या या विमानांनी जवळपास अवघ्या 24 तासात 10 हजार किलोमीटर अंतराचा प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. तशीच वेळ आली तर जर्मनीची विमाने एका दिवसात या क्षेत्रात दाखल होऊ शकतात, हा संदेश या कारवाईतून दिला जात असल्याचे जर्मनीचे वायुसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल इंगो गेराट्झ यांनी सांगितले. सिंगापूर येथील हवाई सरावानंतर विमानांचा हा ताफा ऑस्ट्रेलियातील बहुराष्ट्रीय सरावासाठी रवाना होईल. जर्मन विमाने ऑस्ट्रेलियामध्ये दोन टप्प्यात सराव करणार आहेत. पहिल्या टप्प्यात जर्मनीची विमाने ‘पिच ब्लॅक’ या द्वैवार्षिक बहुराष्ट्रीय युद्धसरावात सामील होतील. तीन आठवडे चालणाऱ्या या सरावात यजमान ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसह भारत, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, युएई, न्यूझीलंड, नेदरलँड, थायलंड यांच्यासह आणखी काही देशांच्या विमानांचा समावेश असेल. जवळपास 2500 जवान आणि 100 लढाऊ विमाने मोठा सराव करणार आहेत. यानंतर जर्मनीची विमाने ऑस्ट्रेलियन विनाशिकांबरोबरच्या सरावात सहभागी होतील.

जागतिक घडामोडींमध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा करून जर्मनीने या क्षेत्रातील आपली उपस्थिती वाढविण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी जर्मनीच्या नौदलातील ‘बेयर’ या विनाशिकेने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातून प्रवास केला होता. तब्बल 20 वर्षानंतर जर्मनीच्या विनाशिकेने या सागरी क्षेत्रातून प्रवास केल्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे त्याकडे लक्ष वेधले गेले होते.

याच काळात साऊथ चायना सीचा वाद पेटला होता. अमेरिका तसेच ऑस्ट्रेलियाच्या विनाशिकांची या क्षेत्रातील गस्तीमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने गंभीर परिणामांची धमकी दिली होती. अशा काळात साऊथ चायना सीमध्ये गस्त घालणाऱ्या जर्मनीच्या विनाशिकेला चीनने धमकावले होते. तसेच चीनने जर्मन विनाशिकेला आपल्या बंदरावर दाखल करून घेण्यास नकार दिला होता. आत्ता तैवानच्या मुद्यावरुन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तणाव निर्माण झालेला असताना, जर्मनीच्या लढाऊ विमानांचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात होणाऱ्या युद्धसरावातील सहभाग चीनला अधिकच ‘असुरक्षित’ बनवू शकतो.

leave a reply