इम्रान खान यांना पाकिस्तानच्या न्यायालयाचा दिलासा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचे संरक्षण दिले आहे. दाखल करण्यात आलेल्या सर्वच खटल्यांप्रकरणी इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला. यामुळे खान व त्यांच्या सहकाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाल्याचे दिसते. असे असले तरी, गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानात झालेल्या हिंसाचार व मालमत्तेच्या हानीप्रकरणी इम्रान खान यांच्यावर नवे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांनी बजावले आहे. या देशाचे विश्लेषक देखील पाकिस्तानचे लष्कर व सरकार इम्रान खान यांची गय करणार नसल्याचे सांगत आहेत.

इम्रान खान यांना पाकिस्तानच्या न्यायालयाचा दिलासागैरव्यवहाराच्या प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. मात्र ही अटक म्हणजे आपल्याला ठार करण्याच्या कारस्थानाचा भाग असल्याचे सांगून इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. यानंतर इम्रान खान यांच्या समर्थकांनी देशभरात हिंसा व जाळपोळीचे सत्र सुरू केले. पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांसह लष्करी अधिकारी व जवानांवर हल्ले चढवून इम्रान खान यांच्या समर्थकांनी अराजक माजविले होते. त्याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागले व कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. तसेच या हिंसाचारात झालेल्या जीवितहानीची खात्रीलायक माहिती अजूनही समोर आलेली नाही. याची गंभीर दखल पाकिस्तानच्या लष्कराने घेतलेली आहे.

म्हणूनच इस्लामाबाद उच्च सर्वच प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केलेला असला, तरी त्यांची खऱ्या अर्थाने सुटका होणार नाही, असे दावे पाकिस्तानातील निरिक्षक करीत आहेत. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांनी गेल्या तीन दिवसात झालेल्या हिंसाचाराला इम्रान खान यांची चिथावणीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच खान यांच्या समर्थकांनी शस्त्रांचा वापर केल्याची बाब राणा सनाउल्लाह यांनी लक्षात आणून दिली. सध्या न्यायालयाने दिलेल्या संरक्षणामुळे इम्रान खान यांना अटक करता येणार नाही. पण पुढच्या काळात इम्रान खान यांच्यावर नवे गुन्हे दाखल केले जातील, असे सनाउल्लाह यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषक देखील आपल्यावरील हल्ल्याला चिथावणी देणाऱ्या इम्रान खान यांची गय करणार नसल्याचे म्हटले आहे. पुढच्या काळात याची फार मोठी किंमत इम्रान खान व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना चुकती करावी लागेल, असे या सर्वांचे म्हणणे आहे.

हिंदी English

 

leave a reply