चीन सीमेवर भारतीय लष्कराचे प्रोजेक्ट ‘जोरावर’

नवी दिल्ली – भारतीय लष्कराने चीनला लागून असलेल्या 15 हजार फूट उंचीवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अत्याधुनिक व हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्याची तयारी केली आहे. यासाठी भारतीय लष्कराने प्रोजेक्ट ‘जोरावर’ हाती घेतले असून याअंतर्गत हलक्या वजनाचे 350 रणगाडे खरेदी करण्यात येणार आहेत. हे रणगाडे अतिउंचीवरील चीनला लागून असलेल्या सीमा भागात तैनात केले जातील. यामुळे भारतीय लष्कराची चीन सीमेवरील स्थिती आणखी मजबूत होईल, असा दावा केला जात आहे.

‘जोरावर’2020 सालामध्ये लडाखमध्ये चीनने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झ्ााला. गलवानमध्ये झ्ाालेल्या संघर्षाने हा तणाव टीपेला पोहोचला असताना भारतावर दडपण वाढविण्यासाठी चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे आणून ठेवले होते. भारत या दडपणाला बळी पडेल. इतक्या उंचीवर आपल्या रणगाड्यांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर आपले रणगाडे आणू शकणार नाही, अशी चीनला खात्री होती. मात्र फार कमी वेळेत टी-72 आणि टी-90 आणि यासह भारतीय बनावटीचे अर्जुन रणगाडे एलएसीवर तैनात करून चीनला अचंबित केले. यामुळे चीनची योजना फसली. उलट चीनला तणाव कमी करण्यासाठी आपले रणगाडे माघारी घ्यावे लागले.

संघर्ष व युद्धजन्य परिस्थिती बरेच काही शिकवत असते. चीनबरोबरील तणावात भारताने धडा घेऊन सीमेवर तैनातीसाठी हलक्या वजनाचे रणगाडे खरेदी करण्याची योजना आखली आहे. यानुसार भारतीय बनावटीचे 350 रणगाडे लष्कर खरेदी करणार असून गेल्यावर्षीं यासंदर्भात लष्कराने आरएफआय अर्थात रिक्वेस्ट ऑफ इन्फॉर्मेशन काढली होती. चीनने आपल्या क्षेत्रात झ्ोडटीक्यू-15 संपूर्ण एलएसीजवळ तैनात केलेले आहेत. भारतालाही अतिउंचीवर सहज नेता येईल अशा रणगाड्यांची आवश्यकता भासत आहे. भारतीय लष्कराने जे आरएफआय काढले आहे. त्यानुसार 25 टन वजनाच्या रणगाड्यांची आवश्यकता व्यक्त केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या डिफेन्स एक्विझ्ािशन कौन्सिलकडून पुढील महिन्यात या प्रोजेक्टला द ॲक्सेप्टन्स ऑफ नेसिसिटी (एओएन) मिळेल, असे वृत्त आहे.

या संपूर्ण प्रोजेक्टला ‘जोरावर’ असे नाव दिले आहे. या नावातूनही भारतीय लष्कराचे चीन व पाकिस्तानला इशारा दिला आहे. ‘जोरावर सिंह कहलुरिया’ यांच्या नावावर या प्रोजेक्टला हे नाव देण्यात आले आहे. जोरावर सिंह कहलुरिया हे जम्मू-काश्मीर साम्राज्याचे संस्थापक महाराजा गुलाब सिंग यांचे सेनापती होती. जोरावर यांच्या नेतृत्त्वातच महाराजा गुलाम सिंग यांनी लडाख, तिबेट, बाल्टिस्तान, स्कर्दू हे प्रांत जम्मू-काश्मीर साम्राज्यात मिळविले. त्यामुळे त्यांना भारताचा नेपोलियनही म्हटले जाते.

दरम्यान भारतीय लष्कराने टी-72 आणि टी-90, तसेच अर्जुन रणगाडेही अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. याची जबाबदारी डीआरडीओने घेतली असून नुकतेच डीआरडीओने अद्ययावत शस्त्र व तंत्रज्ञ्ाानाने सज्ज रणगाड्याची चाचणीही घेतली.

भारत रणगाड्यांच्या तैनातीबरोबर स्वार्म ड्रोन, ड्रोन विरोधी प्रणाली, टेहळणी यंत्रणा, तोफा यांची तैनातीही एलएसीजवळ वाढवत आहे. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर याआधीच क्षेपणास्त्र, तोफा, रणगाडे व इतर यंत्रणात तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षादल भारतीय बनावटीच्या शस्त्रांवर भार देत आहेत. तसेच आर्टीफीशियल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञ्ाानाचा वापर अत्याधुनिक शस्त्र व टेहळणी प्रणालीमध्ये करण्यावर भर आहे. कोणत्याही वातावरणात काम करून शकतील, अशा यंत्रणा डीआरडीओसह इतर भारतीय कंपन्या विकसित करीत आहेत.

leave a reply