बेलारूसच्या लढाऊ विमानांना अण्वस्त्रे जोडण्याची तयारी आहे

- बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी

मिन्स्क – बेलारूसने आपल्या हवाई दलाच्या ताफ्यातील ‘एसयु-24’ लढाऊ विमानांना अण्वस्त्रांची जोडणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले आहेत. त्यामुळे पाश्चिमात्यांनी परिस्थिती चिघळविण्याचे ठरवलेच, तर बेलारूस त्याला जबरदस्त प्रत्युत्तर देईल, असे जाहीर करून बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झ्ाँडर लुकाशेन्को यांनी खळबळ माजविली. युक्रेनच्या युद्धात रशियाला संपूर्ण पाठिंबा देणाऱ्या बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी हा इशारा शेजारच्या पोलंडसाठी आहे की खरोखरच ते सर्वच पाश्चिमात्यांना धमकावत आहेत, यावर चर्चा सुरू झ्ााली आहे.

लढाऊ विमानांनायुक्रेनचे युद्ध सुरू झ्ााल्यापासूनच बेलारूसने आपण रशियाच्या बाजूने उभे असल्याचे जाहीर करून टाकले होते. इतकेच नाही तर रशियन संरक्षणदलांकडून बेलारूसच्या भूमीचा वापर केला जात आहे. तर अमेरिका व नाटोकडून युक्रेनच्या सहाय्यासाठी पोलंड आणि इतर शेजारी देशांचा वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातले देश एकमेकांच्या विरोधात हालचाली करीत असून पोलंडमधील अमेरिका व पाश्चिमात्यांच्या हालचालींचा फार मोठा धोका बेलारूसलाही संभवतो, असे दावे केले जातात.

या पार्श्वभूमीवर, बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी हा इशारा दिला. बेलारूसच्या हवाई दलात ‘एसयु-24’ लढाऊ विमाने आहेत. या विमानांवर अण्वस्त्रे जोडण्यासाठी आवश्यक असलेले बदल करण्यात आले असून कुठल्याही क्षणी ही विमाने अण्वस्त्रांचा मारा करू शकतात, असे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी बजावले. जर ते (पाश्चिमात्य देश) परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करणार असतील, तर हेलिकॉप्टर्स किंवा लढाऊ विमाने त्यांचे संरक्षण करू शकणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे, अशी धमकी बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. त्यांना पोलंडला हा इशारा द्यायचा होता की सर्वच पाश्चिमात्य देशांना त्यांनी ही धमकी दिलेली आहे, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, बेलारूसकडे स्वतःची अण्वस्त्रे नाहीत. पण रशियाकडे असलेल्या अण्वस्त्रांचा मारा बेलारूस करील, असे याद्वारे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को बजावत आहेत. युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचा कडवा समर्थक देश असलेल्या बेलारूसने युक्रेनसह पाश्चिमात्य देशांच्या विरोधात जहाल भूमिका स्वीकारलेली आहे. सध्या रशियाचे सुमारे हजार सैनिक व शस्त्रास्त्रे देखील बेलारूसमध्ये तैनात असल्याचे दावे केले जातात. याबरोबरच रशियाची ‘एस-400’ व ‘एस-300’ या हवाई सुरक्षा यंत्रणांच्या बॅटरीज्‌‍ देखील बेलारूसमध्ये तैनात असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांच्या यंत्रणांनी केले आहेत.

त्यामुळे अमेरिका व नाटो युक्रेनच्या पोलंड तसेच इतर शेजारी देशांचा रशियाविरोधी व्यूहरचनेसाठी वापर करीत असताना, रशियाने बेलारूसचा धोरणात्मक वापर करून या डावपेचांना उत्तर दिल्याचे दिसते आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे युद्ध अधिकच चिघळले आणि बेलारूसवर हल्ला झ्ाालाच, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा संदेश राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को देत आहेत. मात्र त्यांच्या या इशाऱ्यामुळे युक्रेनमधील संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात होईल, ही भीतीदायक शक्यता पुन्हा एकदा जगासमोर आलेली आहे.

leave a reply