चिनी जहाजांच्या घुसखोरीमुळे नको असलेले वैर वाढेल

-फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा इशारा

वैरमनिला – ‘फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील चीनच्या शेकडो जहाजांच्या घुसखोरीमुळेे उभय देशांमधील तणाव आधीच वाढलेला आहे. यापुढेही चिनी जहाजांची घुसखोरी कायम राहिली तर नको असलेले वैर निर्माण होईल’, असा जळजळीत इशारा फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी दिला. आत्तापर्यंत साऊथ चायना सीमधील चीनच्या कारवायांबाबत फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मवाळ भूमिका घेतल्याची टीका सुरू होती. पण सोमवारी फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सुस्पष्ट इशार्‍याद्वारे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला योग्य तो संदेश दिल्याचे दिसत आहे.

महिन्याभरापूर्वी चीनच्या सुमारे २२० जहाजांनी फिलिपाईन्सच्या ‘जुलियन फिलिप’ या द्विपाच्या

वैर

सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. परवानगीशिवाय चीनच्या जहाजांनी आपल्या हद्दीत नांगर टाकल्याचा आरोप फिलिपाईन्सने दिवसांपूर्वी केला होता. लष्करी प्रशिक्षण घेतलेले मिलिशिया अर्थात सशस्त्र दल या जहाजांचे नेतृत्व करीत असल्याचा ठपका फिलिपाईन्सच्या सरकारने ठेवला होता. चीनने ही जहाजे माघारी घ्यावी. अन्यथा आपल्या सागरी हद्दीत बेकायदेशीर बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करण्याचा फिलिपाईन्सला अधिकार असल्याचा इशारा या देशाच्या लष्करप्रमुखांनी दिला होता.

सोमवारी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांचे सल्लागार सॅल्वॅडोर पॅनेलो यांनी अधिक सुस्पष्टपणे चीनला इशारा दिला. फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील चिनी जहाजांच्या उपस्थितीमुळे उभय देशांमधील संबंध ताणले गेले आहेत, असा दावा पॅनेलो यांनी केला. तसेच, ‘या घुसखोरीमुळे उभय देशांना नको असलेले वैर निर्माण होईल’, असा वैरइशारा पॅनेलो यांनी दिला. चीनच्या घुसखोर जहाजांच्या मुद्यावर उभय देशांमध्ये वाटाघाटी होऊ शकतात. पण फिलिपाईन्सच्या सार्वभौमत्वावर तडजोड शक्य नसल्याचेही पॅनेलो यांनी ठणकावले. गेल्या काही दिवसांपासून फिलिपाईन्सने चिनी जहाजांच्या घुसखोरीप्रकरणी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. पण राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी इशारा देऊन चीनला परिस्थितीची जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.

काही तास आधीच फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेंझाना यांनी चीनवर ठपका ठेवला वैरहोता. ‘फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात मिलिशिया जहाजांची तैनाती कायम ठेवून या सागरी क्षेत्राचा घास गिळण्याचा कुटिल डाव चीनने आखला आहे. याआधीही चीनने फिलिपाईन्सचे सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून पॅनातॅग शोल (स्कारबोरो शोल) आणि पँगानिबान रिफ (मिसचिफ रिफ) क्षेत्राचा ताबा घेतला होता’, असा घणाघाती आरोप फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेंझाना यांनी केला होता.

गेल्या काही दिवसांमध्ये फिलिपाईन्सने चीनविरोधात आक्रमक सूर लावले आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने देखील फिलिपाईन्सवर टीका केली होती. सागरी क्षेत्रात हवामान बिघडल्यामुळे आपल्या जहाजांनी सदर क्षेत्रात आश्रय घेतला होता व त्यामध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलेले मिलिशिया नसल्याचा दावा फिलिपाईन्समधील चिनी दूतावासाने केला होता. यावर संतापलेल्या फिलिपाईन्सच्या संरक्षणमंत्र्यांनी चिनी दूतावासाला खडेबोल सुनावले. तसेच या क्षेत्रातील हवामान उत्तम असून चिनी जहाजांनी येथे थांबण्याचे काहीच कारण नाही, असे संरक्षणमंत्री लॉरेंझाना फटकारले आहे.

leave a reply