मोसादचा माजी एजंट व प्रिन्स हमझामध्ये सहकार्य

- जॉर्डनच्या वृत्तसंस्थेचा दावा

अम्मान – नजरकैदेत असलेले प्रिन्स हमझा बिन हुसेन व त्यांच्या कुटुंबियांना खासगी विमानाने सुरक्षितरित्या जॉर्डनच्या बाहेर काढण्याची तयारी झाली होती. इस्रायली गुप्तचर यंत्रणेचा माजी एजंट रॉय शापोश्‍निक याने याबाबत प्रिन्स हमझा यांच्याशी चर्चा केली होती, अशी माहिती जॉर्डनच्या वृत्तसंस्थेने दिली. पण रॉय शापोश्‍निक याने सदर वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.

रॉय शापोश्‍निक याने शनिवारीच प्रिन्स हमझा यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी रॉय याने नजरकैदेत असलेल्या प्रिन्स हमझा, पत्नी बसमा आणि त्यांच्या मुलांना खासगी विमानाने सुरक्षित बाहेर काढण्याची ऑफर दिली होती. रॉय हा मोसादचा माजी एजंट होता, असा दावा जॉर्डनच्या अम्मॉन या वृत्तसंस्थेने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने केला आहे.

पण आपण युरोपात राहतो व कधीच मोसादसाठी काम केलेले नाही, असे रॉय शापोश्‍निकने अरबी संकेतस्थळाशी बोलताना स्पष्ट केले. प्रिन्स हमझा हे आपले चांगले मित्र असून मैत्रीखातर त्यांना मदत करणार होतो. प्रिन्स हमझा यांनीच आपल्याला नजरकैदेत असल्याचे सांगितले म्हणून आपण ही ऑफर दिल्याची माहिती रॉयने दिली.

leave a reply