इराणने मानवतावादी सहाय्याच्या आडून सिरियाला शस्त्रतस्करी केली

- अमेरिकेच्या ‘इंटेल फाईल्स लिक’मधील माहिती

वॉशिंग्टन – फेब्रुवारी महिन्यात प्रलयंकारी भूकंपाने सिरियाला हादरवून टाकले होते. या आपत्तीच्या काळात इराणने सिरियाला मानवतावादी सहाय्य पुरविले होते. पण प्रवासी विमानातून पाठविलेल्या या सहाय्याच्या आडून इराणने सिरियातील आपल्या दहशतवादी संघटनांसाठी शस्त्रतस्करी केली, असा दावा अमेरिका करीत आहे. पेंटॅगॉनच्या ‘इंटेल फाईल्स लिक’मधून ही माहिती उघड झाली.

इराणने मानवतावादी सहाय्याच्या आडून सिरियाला शस्त्रतस्करी केली - अमेरिकेच्या ‘इंटेल फाईल्स लिक’मधील माहितीही माहिती उघड होण्याच्याही आधई इस्रायल इराणबाबत हेच आरोप करीत आला आहे. इराणच्या प्रवासी विमानातून अलेप्पो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा उतरविण्यात आला होता. सिरियात तळ ठोकलेल्या कुद्स फोर्सेस व इतर इराणसंलग्न दहशतवादी संघटनांसाठी इराणने शस्त्रास्त्रे उतरविली होती. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाच्या गहाळ झालेल्या माहितीतही याची नोंद करण्यात आली आहे. सिरियात उतरविलेल्या शस्त्रांमध्ये रायफल्स, रॉकेट्स, ड्रोन्स यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. इराकच्या सीमेतून लष्करी वाहनांमधूनही सिरियात शस्त्रतस्करी झाल्याचे यात म्हटले आहे.

हिंदी

 

leave a reply