‘आयएस’ने अफगाणिस्तानच्या कंदहार स्फोटांची जबाबदारी स्वीकारली

काबुल/तेहरान – अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला आव्हान देणार्‍या ‘आयएस’ने कंदहारमधील स्फोटांची जबाबदारी स्वीकारली. शुक्रवारी शियापंथियांच्या प्रार्थनास्थळात झालेल्या आत्मघाती स्फोटांमध्ये ६३ जणांचा बळी गेला होता. अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे झालेल्या या स्फोटाचे पडसाद पाकिस्तान आणि इराणमध्ये उमटले आहेत. ‘आयएस’चे हे हल्ले अफगाणिस्तानसह इराण व पाकिस्तानला विभागणारे ठरतील, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.
तालिबान कंदहारमधील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्याची माहिती दडवित असल्याचा आरोप केला जातो. या स्फोटात ४७ जणांचाच बळी गेल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. पण शुक्रवारच्या स्फोटांमध्ये ६३ जणांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक, प्रशासकीय अधिकारी तसेच दफनभूमीतील अधिकारी दबक्या आवाजात देत आहेत. याशिवाय रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची अवस्था देखील गंभीर असून बळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जाते. त्याचबरोबर तालिबान आयएसविरोधात कारवाई करीत नसल्याची टीका होत आहे.

‘आयएस’ने अफगाणिस्तानच्या कंदहार स्फोटांची जबाबदारी स्वीकारलीशुक्रवारी उशीरा आयएसने आपल्या सोशल मीडियावरुन कंदहारमधील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. तसेच ‘अनस अल-खोरासानी’ व ‘अबू अली अल-बलूची’ अशी आत्मघाती हल्ले चढविणार्‍या दहशतवाद्यांची नावे असल्याचे आयएसने घोषित केले. या नावांची घोषणा होताच, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. कंदहार येथील स्फोटांद्वारे आयएसने इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना भडकावत असल्याचा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.

‘आयएस’ने अफगाणिस्तानच्या कंदहार स्फोटांची जबाबदारी स्वीकारलीवर्तमान काळातील इराण, मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये खोरासान पसरल्याचा दावा केला जातो. तर इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या दक्षिणेकडे बलोचिस्तान पसरला असून येथील गट स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करीत आहे. याचा थेट उल्लेख न करता, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयएसचे इरादे स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर, कंदहारमधील स्फोटाद्वारे आयएस इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानातील विशेष समुदायाला चिथावणी देत असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच आयएसच्या या अपप्रचाराला या देशांमधील नागरिक बळी पडणार नाहीत, असा विश्‍वास इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला.‘आयएस’ने अफगाणिस्तानच्या कंदहार स्फोटांची जबाबदारी स्वीकारली

कंदहारमधील स्फोटांचे पाकिस्तानातही पडसाद उमटले आहेत. याआधी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद शहरात आयएसने तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते. पण अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील कंदहार प्रांताची सीमा पाकिस्तानला भिडलेली आहे. त्यामुळे कंदहारमधील हा स्फोट पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा पाकिस्तानी विश्‍लेषक करीत आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानातील आयएसच्या वाढत्या प्रभावावर रशियाने देखील चिंता व्यक्त केली होती. आयएस तसेच अल कायदा व त्यांच्याशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनांचा अफगाणिस्तानातील वाढता प्रभाव शेजारी मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेला आव्हान देणारे ठरू शकते, असे रशियाने म्हटले होते.

leave a reply