इस्रायल-अमेरिकामध्ये इराणच्या अणुप्रकल्पावर हवाई हल्ल्याचा सराव

इराणच्या अणुप्रकल्पावरतेल अविव – मंगळवारपासून अमेरिका व इस्रायलच्या हवाईदलात विशेष सराव सुरू झाला आहे. वादग्रस्त इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ले चढविण्याचा अभ्यास अमेरिका व इस्रायलच्या लढाऊ विमानांनी केला. इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर हा सराव सुरू झाल्याचे इस्रायली माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

इस्रायल आणि भूमध्य समुद्राच्या हद्दीत गुरुवारपर्यंत हा सराव सुरू राहणार आहे. यामध्ये अमेरिकेच्या बॉम्बर तर इस्रायलच्या स्टेल्थ लढाऊ विमानांचा सहभाग असल्याचा दावा केला जातो. या निमित्ताने वेगवेगळ्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. यामध्ये इराणच्या वादग्रस्त अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याचा सराव तसेच आखातातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवरील कारवाईचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले.

इराणला थेट संदेश देण्याची हीच योग्य वेळ असल्याचा इशारा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख कोशावी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात दिला होता. यासाठी अमेरिका व इस्रायलमध्ये हवाई सराव आयोजित करण्याचे निश्चित झाले होते.

English हिंदी

leave a reply