इस्रायल-अमेरिकेमध्ये तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

-इस्रायलकडून इंधनवाहू विमाने, हेलिकॉप्टर्सची खरेदी

जेरूसलेम – इस्रायल आणि अमेरिकेमध्ये 3.1 अब्ज डॉलर्सचा संरक्षण सहकार्य करार पार पडला. या करारानुसार इस्रायल अमेरिकेकडून इंधनवाहू टँकर विमाने आणि मालवाहू हेलिकॉप्टर्स खरेदी केली आहेत. यापैकी इंधनवाहू टँकर विमानांमुळे इस्रायली लढाऊ विमानांची लांब पल्ल्यापर्यंत उड्डाणाची क्षमता वाढेल व त्यामुळे अतिदूरवरील हल्ले शक्य होतील, असा दावा इस्रायलचे लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

हेलिकॉप्टर्सची खरेदीइस्रायल आपल्या हवाईदलाच्या आधुनिकीकरणाला महत्त्व देत आहे. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या काही महिन्यांपासून हवाईदलातील जुन्या हेलिकॉप्टर्सच्या जागी प्रगत हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी इस्रायलच्या हालचाली सुरू होत्या. त्याचबरोबर हवाईदलातील लढाऊ विमानांची क्षमता वाढविण्यासाठी इंधनवाहू टँकर विमानांच्या खरेदीबाबत इस्रायलने अमेरिकेबरोबर चर्चा सुरू केली होती.

लॉकहिड मार्टीन आणि बोईंग या अमेरिकेतील दोन आघाडीच्या कंपन्यांबरोबर यासंबंधी करार करण्याचे निश्‍चित झाले होते. पण काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे बायडेन प्रशासन या संरक्षण सहकार्यासाठी तयार नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण दोन दिवसांपूर्वी इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने 3.1 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराची माहिती जाहीर केली.

हेलिकॉप्टर्सची खरेदीयानुसार इस्रायल अमेरिकेकडून 12 सीएच-53के हेलिकॉप्टर्स तसेच दोन केसी-46 टँकर विमाने खरेदी केली आहेत. यापैकी बोईंग कंपनीची केसी-46 विमाने लढाऊ विमानांना हवेतून हवेत इंधन पुरविण्यासाठी सहाय्यक ठरतील. तर लॉकहिड मार्टीन कंपनीचे हेलिकॉप्टर्स मालवाहू तसेच बचावकार्यासाठी वापरली जातील. 2025 सालानंतर ही विमाने आणि हेलिकॉप्टर्स इस्रायली हवाईदलाच्या ताफ्यात सामील होतील.

यातील इंधनवाहू टँकर विमानांच्या खरेदीमुळे इस्रायली हवाईदलातील एफ-15, एफ-16 आणि एफ-35 या प्रगत व अतिप्रगत लढाऊ विमानांच्या मारक क्षमतेत वाढ होईल, हेलिकॉप्टर्सची खरेदीअसा दावा केला जातो. इस्रायल ते इराणपर्यंतचे हवाई अंतर अंदाजे 1,100 मैल इतके आहे. इस्रायली हवाईदलातील विमाने इराणपर्यंतची मोहीम पार पाडून माघारी फिरू शकतात. पण येत्या काळात अरब देशांनी इराणवरील कारवाईसाठी इस्रायलला हवाईमार्ग देण्याचे नाकारले किंवा इतर आकस्मिक परिस्थिती निर्माण झाली तर, सदर इंधनवाहू टँकर विमाने इस्रायली हवाईदलासाठी सहाय्यक ठरतील, असा दावा इस्रायली लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

दरम्यान, इराणबरोबर व्हिएन्ना येथे अणुकरारावर चर्चा सुरू असताना, इस्रायल व अमेरिकेत हा संरक्षण करार झाला आहे, याकडे इस्रायली विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे अणुकार्यक्रमावर तडजोड करण्यास नकार देणाऱ्या इराणवरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न अमेरिका करीत असल्याचे दिसत आहे.

leave a reply