इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इस्रायलच्या हवाईदलाचा सराव

- रेड सी क्षेत्रात इस्रायलच्या नौदलाची गस्त

जेरूसलेम – अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणबरोबर आण्विक वाटाघाटी करण्यासाठी धडपडत असताना, इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी भूमध्य समुद्रात इराणचे अणुप्रकल्प आणि लष्करी ठिकाणे टिपण्याचा सराव केला. तर रेड सीच्या क्षेत्रात आपली पाणबुडी आणि विनाशिका रवाना करून इस्रायलने इराणला इशारा दिल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. याद्वारे इस्रायल इराणविरोधी युद्धासाठी इस्रायल वेगवेगळ्या पातळीवर तयारी करीत असल्याचे इस्रायली विश्लेषकांचे म्हणणे आहे.

इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इस्रायलच्या हवाईदलाचा सराव - रेड सी क्षेत्रात इस्रायलच्या नौदलाची गस्तगेल्या महिन्यात इस्रायलच्या संरक्षणदलाने ‘चॅरिअट्स ऑफ फायर’ या महिनाभर चालणाऱ्या युद्धसरावाची घोषणा केली होती. हा सराव इराणचे अणुप्रकल्प, अतिसंवेदनशील लष्करी ठिकाणे तसेच लेबेनॉन व सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांची ठिकाणे लक्ष्य करण्यावर केंद्रित असेल, असे इस्रायली संरक्षणदलाने जाहीर केले होते. इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्यासाठी आयोजित केलेला आत्तापर्यंतचा हा पहिला असा युद्धसराव असल्याचा दावा इस्रायलने केला होता. महिनाभर चालणाऱ्या या सरावात इस्राइलच्या संरक्षणदलातील बहुतांश युनिट्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सरावाचे फार मोठे महत्त्व असल्याचे इस्रायली विश्लेषकांनी म्हटले होते.

29 मे पासून हा सराव सुरू झाला असून भूमध्य समुद्र तसेच सायप्रसच्या हवाई क्षेत्रात देखील या सरावाचा काही भाग पार पडत आहे. इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इस्रायलच्या हवाईदलाचा सराव - रेड सी क्षेत्रात इस्रायलच्या नौदलाची गस्तयापैकी भूमध्य समुद्रातील सरावात इस्रायलच्या हवाईदलाने इराणच्या अणुप्रकल्पांना टिपण्याचा सराव केला. यामध्ये इस्रायलच्या लढाऊ तसेच बॉम्बर विमानांसह लांब पल्ल्याची आणि इंधनवाहू टँकर्सचा देखील सहभाग होता. भूमध्य समुद्रात हा सराव सुरू असताना, इस्रायलच्या लष्करातील विशेष पथक सायप्रसमध्ये इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवरील हल्ल्याचा सराव करीत होते. लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांची प्रतिकृती उभारून इस्रायली लष्कराने हा सराव केला.

इराणचे अणुप्रकल्प आपल्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहू शकणार नसल्याचा इशारा इस्रायलने याआधी दिला होता. इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनीआपल्या हवाईदलाला इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याची तयारी करण्याचे आदेश दिले होते. इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इस्रायलच्या हवाईदलाचा सराव - रेड सी क्षेत्रात इस्रायलच्या नौदलाची गस्त‘चॅरिअट् ऑफ फायर’ हा युद्धसराव या तयारीचा भाग ठरतो. मात्र इस्रायलने इराणवर असे हल्ले चढविलेचतर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह तसेच सिरिया व गाझापट्टीतील इराणसंलग्न दहशतवादी संघटना एकाच वेळी इस्रायलवर तुटून पडतील, याकडे इस्रायली विश्लेषकांनी लक्ष वेधले होते. याची पूर्ण कल्पना असलेल्या इस्रायलने भूमध्य समुद्रात इराणच्या अणुप्रकल्पांना टिपण्याचा सराव केला. त्याचवेळी सायप्रसमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचाही सराव केला.

या सरावाचा पुढील टप्पा इस्रायलने रेड सीमध्ये सुरू केला आहे. रेड सीच्या सागरी क्षेत्रात इस्रायलने आपल्या दोन विनाशिका आणि पाणबुडी तैनात केल्या आहेत. इराणने येमेनमधील हौथी बंडखोरांच्या सहाय्याने रेड सीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यांना उत्तर देण्यासाठी आपले नौदल सज्ज आहे, हे इस्रायलने या तैनातीद्वारे दाखवून दिल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटलेआहे.

leave a reply