सेंकाकू बेटाजवळील चीनच्या गस्तीचा जपानकडून निषेध

कँप फोस्टर – जपानचा अधिकार असलेल्या सेंकाकू बेटाच्या सागरी हद्दीत चीनच्या गस्तीनौकेने घुसखोरी केली. चीनची ही कारवाई खपवून घेणार नाही, असे जपानने खडसावले आहे. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या राजदूताला समन्स धाडून याप्रकरणी जाब विचारला आहे.

जपानच्या तटरक्षकदलाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास चीनच्या चार गस्तीनौकांनी जपानच्या सेंकाकू बेटांच्या हद्दीत घुसखोरी केली होती. जपानच्या नौदलाने चिनी जहाजांना वॉर्निंग देऊन आपल्या देशाच्या सार्वभौम सागरी क्षेत्रातून माघार घेण्याचा इशारा दिला होता. पण पुढच्या काळात चीनच्या गस्तीनौकांची ही घुसखोरी अजिबात खपवून घेणार नसल्याचे जपानने बजावले आहे.

गेल्या दोन महिन्यात चीनच्या गस्तीनौकांची जपानच्या सागरी हद्दीतील घुसखोरीची ही सहावी घटना ठरते. साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील सेंकाकू बेटांवर जपानचा ताबा आहे. पण सेंकाकू तसेच आजूबाजूच्या क्षेत्रावर आपला हक्क असल्याचे सांगून गेली काही वर्षे चीन या क्षेत्रातील जपानच्या अधिकारांना आव्हान देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply