अमेरिका युक्रेनमध्ये रासायनिक हल्ला घडविण्याच्या तयारीत

रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आरोप

chemical attack in Ukraineमॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिका युक्रेनमध्ये रासायनिक हल्ला चढवून युद्धाला मोठी चिथावणी देण्याच्या तयारीत असल्याचा आरोप रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियातील अमेरिकेच्या माजी राजदूतांनी केलेली वक्तव्ये व युक्रेनमधील संशयास्पद हालचाली यांच्या आधारावर आपण हे वक्तव्य करीत असल्याचे रशियाचे लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांनी सांगितले. किरिलोव्ह हे रशियाच्या ‘रेडिएशन, केमिकल ॲण्ड बायोलॉजिकल प्रोटेक्शन ट्रूप्स’चे प्रमुख आहेत.

chemical attackगेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनमध्ये काही संशयास्पद सामुग्री दाखल झाली आहे. क्रॅमाटोर्स्क शहरात रेल्वेच्या माध्यमातून आलेल्या या सामुग्रीवर ‘बीझेड’ असे लिहिलेले आहे. हे लिखाण रासायनिक घटकांशी संबंधित आहे. वेगवेगळ्या भागातून युक्रेनमध्ये दाखल झालेले रासायनिक घटक परदेशी यंत्रणांवर तैनात करून युद्धभूमीवर पाठविण्यातयेणार आहेत, असा आरोप किरिलोव्ह यांनी केला.

रशियाचे अमेरिकेतील माजी राजदूत जॉन सुलिवन यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात, रशिया रासायनिक हल्ला घडविण्याची तयारी करीत असल्याचा व हा हल्ला ‘फॉल्स फ्लॅग’ प्रकारातील असेल असा दावा केला होता. अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे प्रत्यक्षात अमेरिकाच असा हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत, असेही रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मोठा हल्ला घडवून सर्व दोष रशियावर टाकायचा व रशियाची प्रतिमा मलिन करायची असा डाव असल्याचा दावाही जनरल किरिलोव्ह यांनी केला.

रशियाच्या आरोपांपूर्वी अमेरिका व युक्रेननेही रशियावर रासायनिक हल्ल्याचा कट आखत असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी अमेरिका, युक्रेन व इतर पाश्चिमात्य देशांनी रशिया युक्रेनमधील अणुप्रकल्पात हल्ला घडविण्याची तयारी करीत असल्याचे आरोप केले होते. मात्र त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे कालांतराने समोर आले होते.

leave a reply