उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी जपानकडून ‘पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टिम’ तैनात

टोकिओ/प्योनग्यँग – उत्तर कोरियाकडून करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर जपानने ‘पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टिम’ तैनात केली आहे. जपानचे संरक्षणमंत्री यासुकाझू हमादा यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचे वृत्त जपानी माध्यमांनी प्रसिद्ध केले. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग-उन यांनी लवकरच हेरगिरी उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र यापूर्वी उपग्रह प्रक्षेपित करण्याऐवजी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे उघड झाले होते.

उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी जपानकडून ‘पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टिम’ तैनातअवघ्या 10 दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाकडून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राने तब्बल एक हजार किलोमीटरचा पल्ला गाठला होता. क्षेपणास्त्राची दिशा जपानच्या बाजूने असल्याने जपान सरकारने होकायडो प्रांतातील जनतेचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करीत लष्कराला सज्जतेचे आदेश दिले होते. उत्तर कोरियाची ही चाचणी प्रक्षोभक आणि या क्षेत्रातील तणाव वाढविणारी असल्याची टीकाही जपानने केली होती. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाच्या नव्या चाचणीपूर्वी जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेले आदेश लक्ष वेधून घेणारे ठरतात.

उत्तर कोरियाकडून गेले काही महिने सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या सुरू आहेत. यात आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपासून लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. या क्षेपणास्त्र चाचण्यांदरम्यान नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याचे दावे उत्तर कोरियाकडून करण्यात येत आहेत. 13 एप्रिल रोजी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीतही घन-इंधनाचा वापर करण्यात आल्याचे उत्तर कोरियाकडून सांगण्यात आले होते. उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी जपानकडून ‘पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टिम’ तैनातही क्षेपणास्त्रे स्फोटके सहजपणे वाहून नेऊ शकतात. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांखाली असलेल्या उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात केलेली ही प्रगती धक्कादायक असल्याचे तज्ज्ञ तसेच विश्लेषकांनी बजावले आहे.

त्यामुळे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांनी उपग्रह चाचणीची घोषणा केल्यानंतर जपान सतर्क झाल्याचे दिसत आहे. उत्तर कोरियाकडून पहिल्यांदाच लष्करी हेरगिरीसाठी उपग्रह प्रक्षेपित होत असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी 2012 व 2016 साली उत्तर कोरियाने उपग्रह प्रक्षेपण करीत असल्याचे सांगून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. यावेळी तसे घडल्यास सज्जतेचा भाग म्हणून जपानने आपल्या संरक्षणदलांना ॲलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी जपानकडून ‘पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टिम’ तैनातत्यानुसार, जपानच्या संरक्षणदलांनी पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टिम तैनात केली आहे. त्याचवेळी सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या विनाशिकांनाही ‘एसएम-3 इंटरसेप्टर्स’ सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘उत्तर कोरियाकडून घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अथवा इतर घटकांची चाचणी झाल्यास त्याविरोधात कारवाईचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संरक्षणदलांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत’, असे जपानचे संरक्षणमंत्री हमादा यांनी स्पष्ट केले.

उत्तर कोरियाने 13 एप्रिल रोजी केलेल्या चाचणीनंतर, उत्तर कोरियाच्या कारवायांना उत्तर देण्याची तसेच कोणत्याही प्रकारच्या आकस्मिक घटनांची तयारी ठेवावी, असे आदेश जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी दिले होते. त्यापूर्वी उत्तर कोरिया तसेच चीनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका अधोरेखित करून जपानच्या सरकारने ‘बॉम्ब शेल्टर्स’ उभारण्याची तयारीही सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

leave a reply